JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Bail Pola 2022 : वर्षभर काम करणाऱ्या बैलांविषयी व्यक्त केली जाते कृतज्ञता; असा साजरा होतो पोळ्याचा सण

Bail Pola 2022 : वर्षभर काम करणाऱ्या बैलांविषयी व्यक्त केली जाते कृतज्ञता; असा साजरा होतो पोळ्याचा सण

ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात पोळा साजरा करतात. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून मिरवणूक काढली जाते. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते लोक घरात मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात.

जाहिरात

असा साजरा केला जातो पोळा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑगस्ट : महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्येच्या दिवशी (Pithori Amavasya 2022) बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी (Pola 2022) आहे. या दिवशी बैलांना शेतीतील कामांपासून आराम दिला जातो आणि त्यांची काळजी घेतली जाते. कसा साजरा केला जातो बैल पोळा? बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलांना नदीवर नेऊन उटणे आणि साबण लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर विविध रंगांनी त्यांना सजवले जाते. या दिवशी बैलांना आकर्षक वस्त्र आणि दागदागिने घालून त्यांची पूजा केली जाते. शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतीची धुरा वाहणाऱ्या बैलांला पोळ्याच्या दिवशी विशेष मान दिला जातो. या दिवशी बैलाचे खांदे तुप आणि हळद लावून शेकले जातात आणि बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

Vastu Tips For Chapati : वास्तुशास्त्राप्रमाणे पोळ्या करतांना या चुका टाळा, अन्यथा घरावर येऊ शकतं मोठं संकट

का साजरा केला जातो बैल पोळा? शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात पोळा साजरा करतात. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून मिरवणूक काढली जाते. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते लोक घरात मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांना खाण्यासाठी पुरणपोळीसोबत इतर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

संबंधित बातम्या

इतर राज्यातही साजरा केला जातो पोळा बैल पोळा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मराठी लोकांमध्ये प्रामुख्याने हा सण साजरा केला जातो. विदर्भाच्या सीमेवरील मध्य प्रदेश आणि तेलंगण सीमा भागात देखील पोळा साजरा केला जातो. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हणतात, तर काही ठिकाणी याला बेंदूर देखील म्हटले जाते. याशिवाय छत्तीसगडमधील शेतकरी वर्ग देखील हा सण साजरा करतात. दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते. भारतात इतरही काही ठिकाण पोळा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या