मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips For Chapati : वास्तुशास्त्राप्रमाणे पोळ्या करतांना या चुका टाळा, अन्यथा घरावर येऊ शकतं मोठं संकट

Vastu Tips For Chapati : वास्तुशास्त्राप्रमाणे पोळ्या करतांना या चुका टाळा, अन्यथा घरावर येऊ शकतं मोठं संकट

पोळ्या करतांना या चुका टाळा

पोळ्या करतांना या चुका टाळा

पोळ्यांबद्दलच्या वास्तू टिप्सविषयी बोलायचे तर असे मानले जाते की पोळ्या बनवताना त्या मोजल्या जाऊ नये. पहिली पोळी गायीसाठी आणि कुत्र्यांसाठी का वेगळी केली जाते हे जाणून घेऊया.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 21 ऑगस्ट : आता नवीन पिढीमध्ये एकल कुटुंब म्हणजेच वेगळे राहण्याचा आणि एकटे राहण्याचा ट्रेंड वाढला असल्याने घरातील प्रत्येक सदस्याचा हिशोब करून पोळ्या बनवल्या जातात. परंतु पोळ्या बरीचवेळा केल्या तर नुकसान होते असे मानले जाते. पोळ्यांसाठीहि काही वास्तू टिप्स दिलेल्या आहेत. वाढते लठ्ठपणा-रोग पाहता कमी खाण्याची किंवा ठराविक प्रमाणात किंवा मोजून खाण्याची ही युक्ती दृष्टीक्षेपात चांगली वाटली तरी जीवनावर आणि विशेषतः वास्तुशास्त्रानुसार याचा खूप वाईट परिणाम होतो.

मोजून पोळ्या खाल्ल्याने कुंडलीतील शुभ ग्रहांचा प्रभाव तर बिघडतोच पण घरातील सुख, शांती, समृद्धी आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती असते. चला तर मग आज जाणून घेऊया की पोळ्यांचा ग्रहांशी काय संबंध आहे आणि पोळ्या बनवण्याबाबत धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात कोणते सल्ले दिले आहेत.

नेहमी 4 पोळ्या आवश्यकतेपेक्षा जास्त करा

- ज्योतिषाचार्य पं. शशिशेखर त्रिपाठी सांगतात की, घरातील सदस्यांच्या जेवणासाठी जितक्या पोळ्या लागतात त्यापेक्षा नेहमी ४ ते ५ जास्त पोळ्यांची कणिक तयार करावे. रोज पहिली पोळी गाईसाठी करावी. या पोळीचा आकार तव्याएवढा मोठा असावा, लहान करण्याचे पाप करू नका. त्याच वेळी शेवटची पोळी कुत्र्यासाठी केली पाहिजे. ही पोळी मोडून गाईच्या पोळीपासून वेगळी ठेवावी.

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

- याशिवाय पाहुण्यांसाठी रोज 2 पोळ्या जास्त कराव्यात. सनातन धर्मात अतिथीला देवाचे रूप मानले जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी अनपेक्षितपणे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी रोज जास्तीच्या दोन पोळ्या बनवल्या जायच्या. असे केल्याने माता अन्नपूर्णाची कृपा घरात राहते.

- घरी पाहुणे उपाशी असणे चांगले नाही. जर पाहुणे आले नाहीत तर ही पोळी स्वतः घ्या किंवा गाय किंवा कुत्रा, पक्षी इत्यादींना द्या. शिळ्या पिठापासून बनवलेल्या पोळीमुळे कुटुंबात भांडणे होतात.

- घरी मोजून पोळ्या बनवल्यावर जास्तीचे पीठ रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी वापरले जाते. मात्र असे करणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे कारण त्यात जन्मलेल्या बॅक्टेरियामुळे अनेक आजार होऊ शकतात. त्याशिवाय ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही चुकीचे आहे.

- पोळीचा संबंध सूर्य आणि मंगळाशी आहे. पोळीमुळे आपल्याला ऊर्जा मिळते, पण जेव्हा शिळ्या पिठापासून पोळी बनवली जाते तेव्हा पिठात तयार होणाऱ्या बॅक्टेरियामुळे पोळीचा थेट राहूशी संबंध असतो. अशी पोळी कुत्र्याला खायला द्यावी.

- मात्र जेव्हा ही पोळी कुत्र्याला देण्याऐवजी घरातील लोक खातात तेव्हा ते नेहमीपेक्षा मोठ्या आवाजात बोलतात आणि या परिस्थितीमुळे भांडणे होतात. त्यामुळे घरात शांतता हवी असेल तर घरातील लोकांनी कधीही शिळ्या पिठापासून बनवलेली पोळी खाऊ नये.

घरातील जुना झाडू फेकताना या चुका टाळा; योग्य दिवस आणि नियम जाणून घ्या

- सनातन धर्मात गाय ही पूजनीय मानली जाते. दुसरीकडे, असहाय्य प्राण्यांना चारा देणे आणि त्यांची सेवा करणे हे खूप चांगले कार्य मानले जाते. असे केल्याने एखाद्याचे वाईट कर्म नष्ट होते. त्यामुळे अन्न तयार करताना गायी, कुत्रे, पक्ष्यांचे अन्न दररोज बाजूला ठेवावे.

First published:

Tags: Lifestyle, Religion, Vastu