चांगलं कर्म आणि वाईट कर्म
मुंबई, 03 जून : विविध धर्मग्रंथांमध्ये माणसाच्या कर्माला विशेष महत्त्व दिले गेले आहे. शरीर एक दिवस नष्ट होईल पण व्यक्ती चांगल्या कर्मामुळे जिवंत राहील किंवा वर्षांनुवर्षे स्मरणात राहील. मनुष्य पृथ्वीवर चांगली आणि वाईट दोन्ही कर्म करतो. चांगल्या कर्मांना पुण्य आणि वाईट कर्मांना पाप म्हणून ओळखले जाते. वेद पुराणात हा विषय धर्म आणि अधर्माशी जोडून सांगितला आहे. धर्म म्हणजे पुण्य आणि अधर्म म्हणजे पाप. मनुष्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात जे काही पाप किंवा पुण्य केले असेल, जे 1 वर्ष असो, 1 दिवसाचे असो किंवा एका क्षणाचे असो, त्याचे परिणाम व्यक्तीला जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर भोगावे लागतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत. चाणक्य नीतीच्या पाचव्या अध्यायात असा उल्लेख आहे की- जन्ममृत्यु हि यात्येको भुनक्त्येकः शुभाशुभम्। नरकेषु पतत्येक एको याति परां गतिम्॥ म्हणजे - माणूस एकटाच जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. त्याने आयुष्यात केलेल्या पाप आणि पुण्याचे फळ त्याला एकट्याला भोगावे लागते. पाप करणारा एकटाच अनेक प्रकारचे दुःख सहन करतो. शिवाय मोक्षाची प्राप्ती देखील एकट्या व्यक्तीलाच मिळते. कारण, पती-पत्नी आई-वडील, भाऊ, नातेवाईक कोणीही हे दु:ख शेअर करू शकत नाही.
पापांचा आणि पुण्याचा साक्षीदार वेद पुराणानुसार, माणूस या जगात एकटाच जन्म घेतो, तो मृत्यूनंतर एकटाच दुसऱ्या जगात पोहोचतो. मुक्तिधामला जाण्यापूर्वी त्यांचे स्वतःचे नातेवाईक निघून जातात. मुक्तिधाममध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मृत्यूनंतर त्या व्यक्तीची फक्त पापे आणि सत्कर्मेच त्याच्यासोबत जातात, ज्याचा तो एकटाच त्रास सहन करतो. इथे तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की, जेव्हा माणसाला या जगात एकटे यावे लागते आणि एकटे निघून जावे लागते किंवा त्याने गुप्तपणे काही वाईट कृत्ये केली तर त्याच्या वाईट कर्माचा म्हणजेच पाप-पुण्याचा साक्षीदार कोण असेल? पहिल्यांदाच वट सावित्रीची पूजा करणार आहात? सुहासिनींनी या गोष्टी लक्षात ठेवा चांगल्या आणि वाईट कृत्यांचे 14 साक्षीदार शास्त्रानुसार ज्या प्रकारे दिवसा चंद्र दिसत नाही आणि रात्री सूर्य दिसत नाही. पण या दोघांपैकी एक मात्र सदैव उपस्थित असतात. जसा अग्नी सतत जळत नाही. त्याचप्रमाणे, या जगात काहीतरी आहे जे नेहमी आपल्यासोबत असते, आपल्यावर त्याचे पूर्ण लक्ष असते. यामुळेच जेव्हा एखादा मनुष्य वाईट कृत्य करतो तेव्हा धर्मदेव त्याची माहिती ठेवतात आणि त्या प्राण्याला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा निश्चितच मिळते. शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने चांगले किंवा वाईट कर्म केले तर त्याचे 14 साक्षीदार मानले जातात. त्यापैकी एक किंवा दुसरा माणूस नेहमी उपस्थित असतो. माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे 14 साक्षीदार कोण आहेत. दिवस, रात्र, सूर्य, चंद्र, अग्नी, पृथ्वी, पाणी, वायू, दिशा, धर्म, वेळ, संध्याकाळ, आकाश आणि इंद्रिये. नवरा-बायकोच्या नात्यावर होईल परिणाम, वटपौर्णिमेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)