JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Navratri : औरंगाबादच्या ऐतिहासिक कर्णपुरा यात्रेला सुरूवात, 350 वर्षांची आहे परंपरा

Navratri : औरंगाबादच्या ऐतिहासिक कर्णपुरा यात्रेला सुरूवात, 350 वर्षांची आहे परंपरा

औरंगाबाद शहरातील 350 वर्षांची परंपरा असलेल्या कर्णपुरा यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद 26 सप्टेंबर : शारदीय नवरात्र महोत्सव सुरू झाली आहे. दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते. आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील कर्णपुरा यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 350 वर्षांची परंपरा नवरात्र उत्सव म्हटलं की औरंगाबादकरांना वेध लागतात ते कर्णपुरा यात्रेचे. शहर आणि जिल्ह्याची ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवानीच्या मंदिराला तब्बल 350 वर्षांचा इतिहास आहे. या ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरते. सकाळी मंदिर संस्थानचे विश्वस्त विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी भाविकांमध्ये मोठा उत्साहाचा वातावरण बघायला मिळाले. दररोज सकाळी सात वाजता तर सायंकाळी सहा वाजता देवीची आरती होणार आहे. हेही वाचा :  Navratri : नवरात्राच्या पहिल्या दिवशी दिसलं सप्तश्रृंगी देवीचं मूळ मनोहर रूप, Video पोलिसांचा तगडा बंदोबस्त दोन वर्षानंतर कर्णपुरा यात्रा भरत असल्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनातर्फे तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यासाठी एक सहाय्यक पोलीस आयुक्त सहा पोलीस निरीक्षक 23 पोलीस निरीक्षक तर 222 पोलीस व 72 महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच सीआरपीएफचे जवान देखील तैनात करण्यात आले आहे. सीसीटीव्हीची करडी नजर प्रत्येक नागरिकांवर असणार आहे. त्यासोबतच नागरिकांना दागिने आणि मौल्यवान वस्तू जपून ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांसाठी या सुविधा नागरिकांना वाहतुकीसाठी मंदिराच्या मैदानामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी दिवसात किंवा चार चाकी वाहने पार्किंग करता येणार आहेत. त्यासोबतच या ठिकाणी वैद्यकीय सुविधा देखील ठेवण्यात आले आहेत. चार ठिकाणी डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. येणाऱ्या भाविकांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच मंदिर परिसरामध्ये चप्पल ठेवण्यासाठी स्टॅन्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. हेही वाचा :  Navratri : दांडियामध्ये इतरांवर प्रभाव टाकायचाय? फॉलो करा सोप्या टिप्स Video ‘हे’ रस्ते राहणार बंद लोखंडी फुल ते पंचवटी चौकाकडे जाणारा आणि येणारा मार्ग बंद असणार आहे. पंचवटी ते कोकणवाडी कडे जाणारा रस्ता आणि येणारा रस्ता बंद असणार आहे. बाबा पेट्रोल पंप ते पंचवटी चौक उड्डाणपुलाखाली जाणारा रस्ता व येणारा रस्ता बंद असणार आहे. हे पर्याय मार्ग कोकणवाडी चौकाकडून पंचवटी हॉटेल चौकाकडे जाणारी वाहने रेल्वे स्टेशन किंवा क्रांती चौक मार्गाने जातील. औरंगाबाद रेल्वे स्टेशन कडून मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणारी व येणारी वाहने बाबा पेट्रोल पंप उड्डाणपुराचा वापर करून जातील. धुळे नाशिक कडून येणारी वाहने पैठण कडे जाणारी वाहने विसरण्यापुर फाटा साजापूर फाटा लिंक रोड या मार्गाने धुळे सोलापूर हायवे जातील. नगर पुणे येथून येणारी आणि जालना बीड कडे जाणारी वाहने रोड महानुभव आश्रम चौक या मार्गाने पुढे जातील. बीड जालना कडून व नगर धुळे नाशिक कडे जाणारी वाहने बीड बायपास रोड महानुभाव आश्रम चौक मार्गे पुढे जाते. नाशिक धुळे येथून येणारी आणि जालना बीड कडे जाणारी वाहने शरणापुर फाटा साजापूर फाटा रोड महानुभव आश्रम चौक बीड बायपास रोड या मार्गाने जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या