मुंबई, 26 सप्टेंबर : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होत आहे. नवरात्रीमध्ये शुभेच्छांसोबत गरबा आणि दांडिया उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण या उत्सवात गरबा आणि दांडियाचे प्रकार कोणते आणि तो कसा खेळला जातो याची माहिती बऱ्याच जणांना नसते. याचीच माहिती नृत्य शिक्षिका प्रियंका पुरोहित यांनी सांगितली आहे.
कसा खेळला जातो दांडिया?
रंगीबेरंगी स्वरूपात सजविलेल्या बांबूच्या काठ्या दांडिया म्हणून ओळखल्या जातात. या काठ्या हातात घेऊन केलेल्या नृत्याला दांडिया नृत्य किंवा दांडिया रास असे संबोधिले जाते. स्त्री आणि पुरुष गोलाकार फेर स्वरूपात हे नृत्य करतात. रंगीबेरंगी पोशाख आणि दागिने घालून महिला या नृत्यात सहभागी होतात.
हेही वाचा : Navratri 2022: नवरात्रीत न थकता गरबा खेळायचाय? निरोगी शरीर अन् सौंदर्यासाठी फॉलो करा खास टिप्स
तर पुरुष पारंपरिक पगडी, धोतर असा पोशाख परिधान करतात. या पोशाखांवर काचांचे तुकडे, लोलक किंवा मोती इ.चा वापर करून नक्षीकाम केले जाते आणि या पोशाखांचे सुशोभीकरण केले जाते. दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. हे समूहनृत्य नवरात्रात केले जाते.
दांडियाचे प्रकार
अनेक प्रकारचा दांडिया खेळला जातो. हल्ली फ्युजन स्टेप्स बनवून सोप्या पद्धतीने दांडिया खेळतात. पोपटीयो, हुड्डा, हिच तसेच गुजरातमधील गावांच्या नावावरून देखील दांडियाचे प्रकार पहायला मिळतात.
हेही वाचा : Navratri : नवरात्राच्या पहिल्या दिवशी पाहा सप्तश्रृंगी देवीचं मूळ मनोहर रूप! Video
हे आहेत गरब्याचे प्रकार
अहमदाबादी दोडियो (अहमदाबादचा), बरोडो दोडियो (बडोद्याचा), सुरतियो दोडियो (सुरतचा) दोडीयो हा गरब्याचा नृत्य प्रकार आहे. तीन पगली, चार पगली, पाच पगली, ई. प्रकारे गरबा आणि दांडिया खेळला जातो. एका दांडिया स्टेप मध्ये जितकी पाऊल आपण टाकू तितकी पगली मोजली जाते. पगली (पाऊल) किंवा ताली असे सुद्धा यास म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.