JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Guru Purnima : गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर करा 'या' गोष्टी, आयुष्यात सर्वार्थानं होईल उन्नती, Video

Guru Purnima : गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर करा 'या' गोष्टी, आयुष्यात सर्वार्थानं होईल उन्नती, Video

गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर कोणत्या गोष्टी केल्यानं आयुष्यात सर्वार्थानं उन्नती होईल पाहा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 1 जुलै : आपले आयुष्य घडवण्यात गुरुंचा सिंहाचा वाटा असतो. गुरु ही केवळ व्यक्ती नाही, तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रत्येक क्षण आणि त्यासाठी माध्यम झालेली वस्तू, व्यक्ती किंवा अन्य कोणतीही गोष्ट गुरु असू शकते. म्हणून ग्रंथांना गुरु मानले आहे तसे अनुभवालाही गुरु मानले आहे, वाटसरूला गुरु मानले आहे, तसे मार्गदर्शन करणाऱ्याला गुरु मानले आहे. ते कोणत्याही रूपात येऊन आपला उद्धार करू शकतात. त्यांच्याप्रती ऋण निर्देश करण्यासाठी आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. हा अतिशय पवित्र दिवस असून या दिवशी काही उपाययोजना, पूजाविधी केल्यास जीवनात सर्वार्थाने उन्नती साधण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या विषयी ज्योतिष शास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद भूषण यांनी काय सल्ला दिला आहे जाणून घेऊया.

गुरू या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचं आपल्या आयुष्यातलं स्थान अनन्यसाधारण आहे. गुरू पौर्णिमा ही आषाढ शुक्ल पौर्णिमेला मानली जाते. हा दिवस अतिशय भाग्याचा आणि उत्तम योगाचा मनाला जातो. त्यामुळे या दिवसाचे मुहूर्त आणि महत्त्व लक्ष्यात घेता अनेक शुभ कार्य केले जाते. मनुष्याच्या वैवाहिक जीवनात, करिअर अथवा अन्य कुठल्याही बाबतीत त्रास अथवा अडचण असल्यास तर या दिवशी काही उपाक केल्याने त्याचे फळ अवश्य मिळत असते. हे केल्याने गुरूंची कृपादृष्टी गुरू पौर्णिमा ही गुरू शिष्यातील एक महत्वाचा दिवस आहे. या दिवशी गुरूंचे पूजन करून आशीर्वाद घ्यावे. गुरूंना घरी बोलावून त्यांना भेटवस्तू द्यावी. त्यांचे आदरतिथ्य करावे. तसेच घरी गुरू यंत्राची स्थापना करून त्यावर पिवळे फुल वहावे, तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि 21 वेळा प्रदक्षिणा घालून ओम गुरुवेय नम: हा जप करावा. हे केल्याने गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर राहील आणि आर्शिवाद प्राप्त होईल. याशिवाय जीवनातील विकार असतील काही समस्या असतील त्या दूर होतील.

Gurupurnima : गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘या’ राशींच्या व्यक्तींनी करा दान, होईल भरभराट

गुरुदोष निवारणासाठी हे करा उपाय गुरू पौर्णिमेचे मुहूर्त साधून आपण आपल्या आयुष्यात असलेला गुरू दोष निवारणासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस मानल्या जातो. वैवाहिक जीवन, करिअर, आरोग्य अथवा इतर बाधा दूर करण्यासाठी गुरु पौर्णिमेच्या दिवशी एका पिंपळाच्या पानावर शेंदुराने स्वस्तिक काढून त्याची पूजा अर्चना करून ते पान हनुमानाला वाहून द्यावे आणि हनुमान चालीसाचे पठण करावे तसेच घरी सत्यनारायणाची पूजा आणि विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा हे केल्याने आयुष्यातील गुरुदोषाची मुक्तता होऊन फलप्राप्ती होते, अशी माहिती ज्योतिषशास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद भूषण यांनी बोलताना दिली. गुरु ग्रहांचा देखील ठरतो महत्त्वाचा आपल्या आयुष्यात राशीशी निगडित खड्यांचे महत्व आहे. पाच ते सात ग्राम वजनाचा पिवळा पुष्कराज खडा हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी घातल्याने त्याचे अनेक फायदे आहेत हा कडा शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन करून ओम गुरुवेय नमः या मंत्राचा जप करून परिधान करावा. तसेच पाच मुखी रुद्राक्ष हा गुरुदोष निवारण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

Guru purnima Rashifal: गुरुपौर्णिमेला फिरेल या 3 राशींच्या भाग्याचे चक्र! वैवाहिक जीवन होईल सुखी

संबंधित बातम्या

विश्वास, श्रद्धा आणि चांगले कर्म याचीच फलश्रुती कुठल्याही गोष्टीवर आपली श्रद्धा विश्वास आणि व्यक्तिगत जीवनातील चांगले कर्म हेच माणसाचे आयुष्य समृद्ध करत असते. त्यामुळे या गोष्टी आयुष्याला सर्वांना समृद्ध सुखी समाधानी करण्यासाठी पूरक असतील. मात्र आपले चांगले आचरण देवावरील श्रद्धा आणि चांगले कर्म हेच आयुष्याची फलश्रुती ठरवत असतात, असे मत ज्योतिष शास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद भूषण यांनी बोलताना व्यक्त केले.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या