JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Mesh Sankranti 2023: पितृदोषाने त्रस्त असाल तर मेष संक्रांतीच्या दिवशी करा ही कामं; सर्व त्रास दूर होतील

Mesh Sankranti 2023: पितृदोषाने त्रस्त असाल तर मेष संक्रांतीच्या दिवशी करा ही कामं; सर्व त्रास दूर होतील

Mesh Sankranti 2023: पंचागानुसार, या वेळी 14 एप्रिलला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत असल्यानं मेष संक्राती होईल. काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांच्या मते, मेष संक्रांतीच्या पुण्यकाळाची वेळ 15 एप्रिलला सकाळी असेल.

जाहिरात

मेष संक्राती पितृदोष उपाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाराणसी, 12 एप्रिल : सनातन हिंदू धर्मात संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. एका वर्षात 12 संक्रांती असतात, त्यात मेष संक्रांत विशेष फलदायी मानली जाते. पंचागानुसार, या वेळी 14 एप्रिलला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत असल्यानं मेष संक्राती होईल. काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांच्या मते, मेष संक्रांतीच्या पुण्यकाळाची वेळ 15 एप्रिलला सकाळी असेल. स्नान-दान व्यतिरिक्त हा दिवस तर्पणासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. काशीचे पंडित संजय उपाध्याय म्हणाले की, मेष संक्रांतीच्या दिवशी गंगेशिवाय इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं अनेक पटींनी परिणाम मिळतो. याशिवाय पितृदोषाने त्रासलेल्या व्यक्तीने या दिवशी तर्पण करावे. याशिवाय मातीच्या मडक्यामध्ये पाणी आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली फळे गरीब ब्राह्मणाला/ गरजूंना आपल्या क्षमतेनुसार दान करावे. यामुळे मनुष्याला त्याच्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होतो, असे मानले जाते. एक महिन्यासाठी लाभ - धार्मिक मान्यतेनुसार मेष संक्रांतीच्या दिवशी दान केल्यास शाश्वत पुण्य प्राप्त होते. या दिवशी दिलेल्या दानाचे फळ महिनाभर मिळते. त्यामुळेच या दिवशी धार्मिक नगरांमध्ये स्नान आणि दानासाठी घाटांवर गर्दी असते.

शुभ कार्ये सुरू होतात - स्वामी कन्हैया महाराज म्हणाले की, सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्यावर खरमास संपतो. याशिवाय शुभ कार्यही सुरू होतात. संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्त, त्यानंतर लग्न, मुंडन वगळता सर्व प्रकारची शुभ कार्ये सुरू होतात. हे वाचा -   सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची ‘अशी’ बैठक जुळायला लागते (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या