JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / मौनी अमावस्येला आज करा या एका स्तोत्राचा पाठ; घरावरील पितृदोष जाईल निघून

मौनी अमावस्येला आज करा या एका स्तोत्राचा पाठ; घरावरील पितृदोष जाईल निघून

पितृ स्तोत्राचे पठण केल्याने पितृदोष दूर होतो. पितृदोषामुळे माणसाची प्रगती होत नाही, संततीचे सुख मिळत नाही. कुटुंबात नेहमीच संकट असते, यासाठी मौनी अमावस्येला…

जाहिरात

दर्श मौनी अमावस्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जानेवारी : आज 21 जानेवारीला मौनी अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठीही उपाय केले जातात. मौनी अमावस्येला स्नान केल्यावर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करू शकता. पितृ स्तोत्राचे पठण केल्याने पितृदोष दूर होतो. पितृदोषामुळे माणसाची प्रगती होत नाही, संततीचे सुख मिळत नाही. कुटुंबात नेहमीच संकट असते, अशांतता असते, कामात यश मिळत नाही, जे काम सुरू केले जाते त्यामध्ये अडचणी येतात, असे मानले जाते. पितृदोष पूर्वजांमुळे होतो, काही कारणांनी आपले पूर्वज नाराज असतील आणि त्यांचा शाप लागल्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात. पितृदोषावर उपाय - तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव म्हणतात की पितृपक्ष हा पूर्वजांच्या आत्मतृप्तीसाठी केला जातो, याशिवाय आपण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांना संतुष्ट करू शकता. पूर्वज तुमच्यावर प्रसन्न असतील तेव्हा पितृदोष उद्भवणार नाही. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आज मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करून पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यानंतर त्यांच्यासाठी पिंडदान करावे. कोणत्याही पूर्वजांचे श्राद्ध कर्म झाले नसेल तर श्राद्ध करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

पितृ स्तोत्र पठण - पूर्वजांची पूजा करताना पितृ स्तोत्राचे पठण करावे. पितृस्तोत्र संस्कृतमध्ये दिलेला आहे. तुम्ही तो अचूकपणे वाचा. जर तुम्हाला वाचता येत नसेल, तर तो वाचण्यासाठी योग्य पंडितजींना बोलवा. त्यानंतर पूर्वजांना नमन करा आणि म्हणा की तुम्ही त्यांना जल, वचन, पिंडदान इत्यादींनी तृप्त करत आहात. तुम्ही समाधानी राहा आणि आम्हाला आनंदी आयुष्य द्या. पितृ स्तोत्राव्यतिरिक्त आपण इच्छित असल्यास पितृ सूक्तदेखील पाठ करू शकता. हे वाचा -  यंदाची मौनी अमावस्या 4 राजयोगांमध्ये! शनि अमावस्येशी आहे दुर्मिळ संयोग पितृ स्तोत्र अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम्। नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।। इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा। सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान्।। मन्वादीनां च नेतार: सूर्याचन्दमसोस्तथा। तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्युदधावपि।। नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा। द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि:।। देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्। अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येहं कृताञ्जलि:।। प्रजापते: कश्पाय सोमाय वरुणाय च। योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि:।। नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु। स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे।। सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा। नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्।। अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम्। अग्रीषोममयं विश्वं यत एतदशेषत:।। हे वाचा -  30 वर्षांनी दर्श मौनी अमावस्येला जुळून आलाय हा दुर्मिळ योग, स्नान-दानाला महत्त्व ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्रिमूर्तय:। जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण:।। तेभ्योखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतामनस:। नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज।। (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या