यंदाची मौनी अमावस्या 4 राजयोगांमध्ये! शनि अमावस्येशी आहे दुर्मिळ संयोग

 यंदाची मौनी अमावस्या 21 जानेवारीला शनिवारी आहे.

20 वर्षांनंतर मौनी अमावस्येला शनि अमावस्येचा शुभ संयोग आहे. 

याशिवाय मौनी अमावस्येला चार राजयोगही तयार होत आहेत, त्यामुळे यंदाची मौनी अमावस्या आणखीनच खास बनली आहे. 

यंदा मौनी अमावस्येला सत्कीर्ती, हर्ष, भारती आणि ज्येष्ठ असे चार राजयोग तयार होत आहेत.

याशिवाय सूर्य आणि शुक्र मकर राशीत असल्यामुळे खापर योगही या दिवशी तयार होईल. 

मौनी अमावस्येला 30 वर्षांनंतर खापर योग तयार झाला आहे. खापर योगात शनिदेवाशी संबंधित उपाय केल्यानं त्याचे दुष्परिणाम संपतात.

साडेसाती किंवा शनिदोषाच्या उपायांसाठी खापर योग अत्यंत शुभ मानला जातो.

या वर्षी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करून शनिदेवाची पूजा करावी. शनि रक्षा कवच पठण इत्यादी करावे.

तुमची पापे दूर होतील आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करा.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.