JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Makar Sankranti 2023: मकर संक्रातीच्या दिवशी न चुकता करावं हे काम; कौटुंबिक सुख-शांती नांदेल सर्वकाळ

Makar Sankranti 2023: मकर संक्रातीच्या दिवशी न चुकता करावं हे काम; कौटुंबिक सुख-शांती नांदेल सर्वकाळ

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने कुंडलीत सूर्य बलवान राहतो आणि अडलेली कामंही सहज पूर्ण होतात. या दिवशी सूर्यदेवाची उपासना करणे धन-संपत्तीसाठी विशेष लाभदायक असते.

जाहिरात

मकर संक्रातीचे स्नान, सूर्यपूजा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जानेवारी : मकर संक्रांत हा सनातन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वर्षातील पहिला सण असण्यासोबतच हा दान आणि उपासनेसाठीही विशेष सण मानला जातो. या सणात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भविष्य पुराणानुसार संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण किंवा सूर्याच्या दक्षिणायनच्या दिवशी उपवास करणे फायदेशीर मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामध्ये संक्रांतीच्या पहिल्या दिवशी एकदाच भोजन करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने कुंडलीत सूर्य बलवान राहतो आणि अडलेली कामंही सहज पूर्ण होतात. या दिवशी सूर्यदेवाची उपासना करणं धन-संपत्तीसाठी विशेष लाभदायक असतं. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया या दिवशी तीळ आणि तिळाच्या तेलाने स्नान करण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात तीळ किंवा तिळाचे तेल टाकून स्नान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. असे मानले जाते की पाण्यात तीळ किंवा तिळाचे तेल टाकून स्नान केल्यानं घरातील आणि जीवनातील दुर्दैव नाहीसं होतं आणि यश मिळतं. या दिवशी देवाला तिळापासून बनवलेले लाडू नैवेद्यात अर्पण करावेत, यामुळे व्यवसायात लाभ होतो आणि कौटुंबिक कलहही दूर होतात. पाण्यात तिळाचे तेल टाकून स्नान करण्याचे शास्त्रीय महत्त्व - मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात तीळ किंवा तिळाचे तेल टाकून स्नान करण्याचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे. तिळाच्या तेलात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ते त्वचेच्या पेशी निरोगी ठेवतात. तिळाच्या तेलाचा प्रभाव गरम असतो, त्यामुळे हिवाळ्यात पाण्याच तिळाचे तेल घालून आंघोळ करणे खूप फायदेशीर असते. यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. त्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. तिळाचे तेल त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार बरे होतात. हे मुक्त रॅडिकल्स आणि असंतुलित रेणूंपासून सेल संरचनेचे संरक्षण करण्यास मदत करते. यामध्ये अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटतात, जे त्वचेची छिद्रे बंद होऊ देत नाही.

सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व - मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी पवित्र नदी किंवा तीर्थात स्नान केल्यानं पुण्य आणि मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. यासोबतच संक्रांतीच्या दिवशी पूर्वजांचे ध्यान करून त्यांना तर्पण द्यावे. घरातील एखाद्या व्यक्तीला काही गंभीर आजार असेल तर तांब्याच्या कलशात पांढरे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्पण केल्यास हा आजार दूर होतो, असेही सांगितले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला दूध आणि तीळ पाण्यात मिसळून अर्पण केल्यानंही लाभ होतो आणि वैवाहिक जीवनात गोडवा येतो, असे मानले जाते. हे वाचा -  या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या