एखाद्या व्यक्तीच्या काही वाईट सवयींमुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि त्या व्यक्तीला नेहमी पैशांची चणचण सोसावी लागते.
हिंदू धर्मातील गरुड पुराणाला महान पुराण मानले जाते, ज्याचे पालन केल्याने घरात अपार सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.
जे लोक घाणेरडे कपडे घालतात आणि घाणेरडे जीवन जगतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी रागावते. अशा लोकांच्या आयुष्यात लक्ष्मीचा आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही
अस्वच्छतेमुळे कितीही कष्ट केले तरी जीवनात सुख-समृद्धी येत नाही. नीट-नेटके न राहणाऱ्या लोकांना माता लक्ष्मी कधीही आशीर्वाद देत नाही.
जे लोक सूर्योदयानंतरही झोपून राहतात, त्यांना आयुष्यात कधीही सुख, यश, समृद्धी आणि उत्तम आरोग्य मिळू शकत नाही.
सूर्योदयानंतर झोपेतून उठणारे लोक आपले जीवन दुःख आणि गरिबीत घालवतात.
तसेच सूर्यास्ताच्या वेळी झोपणाऱ्या लोकांवरही माता लक्ष्मीचा कोप होतो.
लक्ष्मी माता अशा घरांमध्ये कधीच राहत नाही, जिथे लोक संध्याकाळी झोपतात कारण ही वेळ घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाची असते.
शास्त्रात अशा काही चुकीच्या सवयी सांगितल्या आहेत, ज्यापासून नेहमी दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)