मराठी बातम्या /बातम्या /religion /या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

अगरबत्ती कधी लावू नये

अगरबत्ती कधी लावू नये

Astro Tips: पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, विविध देवतांच्या पूजा-विधी वेळी अगरबत्ती वापरली जात असली तरी आठवड्यातील दोन दिवशी अगरबत्ती वापरण्यास मनाई आहे. असे केल्याने घरातील शांती-समृद्धीवर परिणाम होऊ शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 जानेवारी : हिंदू धर्मात देवाची पूजा करताना अगरबत्ती, धूपबत्ती लावण्याची परंपरा आहे. अगरबत्ती ही शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. असे मानले जाते की, सकाळ-संध्याकाळ घरात अगरबत्ती लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते, घरात सुख-समृद्धी टिकून राहते, परंतु वास्तुशास्त्रात अगरबत्तीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, विविध देवतांच्या पूजा-विधी वेळी अगरबत्ती वापरली जात असली तरी आठवड्यातील दोन दिवशी अगरबत्ती वापरण्यास मनाई आहे. असे केल्याने घरातील शांती-समृद्धीवर परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या आठवड्यातील कोणत्या दिवशी अगरबत्ती लावू नये.

अगरबत्ती लावण्याचे फायदे -

अगरबत्ती लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि वातावरण सकारात्मक राहते. यामुळे देवताही प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने सुख-समृद्धी प्राप्त होते. अगरबत्तीचा धूर हवा शुद्ध करतो आणि हानिकारक जीवाणू नष्ट करतो. अगरबत्ती व्यतिरिक्त, धूपबत्ती, कापूर लावून देवाची पूजा करणे देखील शुभ आहे.

दोन दिवस अगरबत्ती लावू नये -

ज्योतिषशास्त्रानुसार, अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. वास्तूनुसार, घरामध्ये बांबूच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. परंतु रविवारी आणि मंगळवारी बांबू जाळण्यास शास्त्रात निषिद्ध मानले जाते. त्यामुळे रविवारी आणि मंगळवारी अगरबत्ती लावू नये, असे केल्याने मानसिक आणि आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे घरात गरिबी येते आणि कुटुंबात तणाव राहतो, असे मानले जाते.

नुकसान काय -

पौराणिक शास्त्रानुसार मंगळवार आणि रविवारी बांबू जाळल्याने संततीची हानी होण्याचा धोका असतो. याशिवाय या दिवशी बांबू जाळल्याने पितृदोष होतो, त्यामुळे कुटुंबात सुख-शांती राहत नाही. बांबू जाळल्याने दुर्दैव येते. तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागेल, त्यामुळे या दोन दिवशी शास्त्रात अगरबत्ती जाळण्यास मनाई आहे.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Religion