JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भांग घेण्याचा प्लॅन आहे? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भांग घेण्याचा प्लॅन आहे? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी भांग घेण्याचा तुमचा विचार असेल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला नक्की पाहा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 18 फेब्रुवारी : महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण भांग खातात. मित्रांच्या मैफीलीत त्याची सुरूवा होते. काही जणांना त्याची चांगलीच चटक लागते. गोड दूध किंवा गोड प्रसादाच्या नावाखाली भांग खाणे ही महाशिवरात्रीची परंपरा आहे. महादेवाचा प्रसादाच आपण खात आहोत, अशी भांगप्रेमी मंडळींची समजूत असते. त्या सर्वांनी भांग खाण्यापूर्वी नाशिकच्या डॉक्टांरांनी दिलेला इशारा समजून घ्यायला हवा. काय होतात परिणाम ? नाशिकमधील डॉ. संजय राकिंबे यांनी भंग खाल्ल्यानंतर होणारे परिणाम समजावून सांगितले आहेत. ‘आजकालच्या तरुणाईला हाय ऑन होणे, हवेत जाणे, हा प्रकार खूप आवडतो. भांग घेणारी व्यक्ती या पद्धतीनं ‘हाय ऑन’ होण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण स्वत:च्या विश्वातून एका वेगळ्याच विश्वात जातो.  नको ती बडबड करणे. आरडाओरड करणे, सतत हसणे यासारखे प्रकार या नशेतील व्यक्ती करते. आपण किती वेळ हसत किंवा रडत आहोत? किती वेळ चालत आहोत? याची जाणीवही त्या व्यक्तीला नसते. भांग घेतल्यानंतर साधारण 12 ते 24 तास हा प्रभाव राहू शकतो. त्यानंतर हळूहळू हा प्रभाव कमी होतो. डोळे एकदम ताठ होणे, लाल होणे, बोलताना अडखळणे, खूप गोड खाण्याची इच्छा होणे ही त्याची प्राथमिक लक्षणं आहेत. अती प्रमाणात भांग घेतली तर ती नक्कीच जीवघेणी ठरू शकते. विशेषत: ज्यांना याची सवय नाही त्यांना जास्त त्रास होऊ शकतो, असा इशारा डॉ. राकिंबे यांनी दिला आहे. महाशिवरात्रीला शास्त्रानुसार भांग खाण्याची प्रथा असते का? नाशिकच्या महंतांनी दिलं वेगळच कारण, Video ‘महाशिवरात्र तसेच रंगपंचमीच्या काळात भांग घेऊन अनेक जण आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात. आम्हाला त्यांची ट्रिटमेंट करावी लागते. त्यावेळी त्यांची मेडिकल हिस्ट्री समजत नाही. त्यांनी किती भांग घेतलीय हे समजत नाही. आपण कशासोबत भांग घेतलीय हे माहिती नसतं. त्यामुळे ट्रिटमेंट करणे अवघड होते. या प्रकारच्या पेशंटला सलाईन, झोपेच्या इंजेक्शनची गरज लागते, असा अनुभव डॉक्टरांनी सांगितला. कुणाला धोका जास्त? भांगेची नशा केल्यानंतर ऱ्हदयाची गती वाढण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना ऱ्हदयाचा विकार आहे त्यांना याची गती वाढल्यानं आणखी त्रास होऊ शकतो. डायबेटिज झालेल्या रुग्णांना साखरेचे प्रमाण जास्त झालं तर नशा जास्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रुग्णांनी भांग अजिबात घेऊ नये. उपवासासाठी भगर खरेदी करताना सावधान, धोका टाळण्यासाठी पाहा Video एकदा शरिरात भांग गेली तर त्याचा परिणाम आठ तासांपासून 24 तासंपर्यंत राहू शकतो. भांग घेण्याच्या प्रमाणावर ते अवलंबून आहे. डॉक्टरकडे तात्काळ जाऊन उपचार घेतले तर काही प्रमाणात इलाज होऊ शकतात. पण, त्याचा इफेक्ट लगेच कमी करण्यासाठी कोणतेही औषध नाही. डॉक्टरांकडे गेल्यावर त्याचे होणारे साईड इफेक्ट नक्की कमी होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भांग घेऊन किंवा या प्रकारची नशा करून वाहन चालवू नका, अपघात होण्याची शक्यता असते. कोणतीही नशा वाईट आहे. देवाच्या किंवा धर्माच्या नावाखाली ती केली तर आणखी वाईट असते.त्यामुळे कुणीही भांग खाऊ नये त्याचे दुष्परिणाम खूप आहेत, असं आवाहन डॉ. संजय राकिंबे यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या