JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Maghi Wari : माऊलींच्या अश्वाचे सोलापुरात गोल रिंगण, वारकऱ्यांनी दिला महत्त्वाचा संदेश, Video

Maghi Wari : माऊलींच्या अश्वाचे सोलापुरात गोल रिंगण, वारकऱ्यांनी दिला महत्त्वाचा संदेश, Video

Maghi Wari : माऊलींच्या दोन अश्वांचा हा रिंगण सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 28 जानेवारी : अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरच्या माघ वारीच्या निमित्तानं सोलापुरात रिंगण सोहळा पार पडला. माऊलींच्या दोन अश्वांचा हा रिंगण सोहळा ‘याची देही याची डोळा’  पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. कसं पार पडलं रिंगण? ध्वज करी ,विणेकरी ,तालवादक आणि तुळशी महिलांचे रिंगण पार पडल्यावर शेवटी माऊलींच्या आश्वाचा रिंगण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सर्वत्र ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय’ हा जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. कामाठीपुऱ्याच्या गल्लीत कसा साजरा होतो गणेशोत्सव? पाहा Video यावेळी सर्वच वारकरी मोठ्या भक्ती भावाने विठ्ठल नामाचा गजर करत होते.शिवाय काही महिलांनी मोठ्या भक्ती भावाने विठ्ठल आणि रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली होती.त्यानंतर तुळशी डोक्यावर घेऊन अनेक महिलांनी आपले रिंगण पार केले.विणेकरांचे रिंगण हे सर्वात आकर्षक असे ठरले. सर्वच वारकरी मोठा शिस्तीने आणि तेवढ्याच उत्साहात आपले रिंगण पूर्ण करताना दिसत होते.

माघ वारी सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी प्रथमच ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचा सहभाग असल्यामुळे भाविकांमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला होता. तसेच हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त शहरवासीयांनी गर्दी केली होती. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीसोहळ्यातील सर्वात मोठे मानले जाणारे वाखरीचे रिंगण होय. त्याचीच प्रचिती सोलापूरकरांना यावेळी आली.

‘दरवर्षी आम्ही हा रिंगण सोहळा घेऊन मागवारी निमित्त पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची एक प्रकारे सेवाच करत असतो. यंदाचे आमचे हे बारावे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन आम्ही ती रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून सर्वांना दाखवत असतो. यंदाच्या वर्षी अपघात टाळण्याचे निश्चित ध्येय आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक वारकऱ्याला रिफ्लेक्टर किट देत आहोत जेणेकरून संध्याकाळी सुद्धा वारकरी रस्त्याने चालत जात असताना सहजासहजी तो वाहन चालकाला दिसेल आणि अपघात टळेल, अशी प्रतिक्रिया सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या