मुंबई, 27 जानेवारी : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लाडक्या बाप्पाचं सर्वजण मनापासून करतात. बाप्पाच्या दरबारात कुणीही लहान-मोठा नसतो. मुंबईतल्या कामाठीपुराच्या पाचव्या गल्लीतही बाप्पा विराजमान झालाय. या ठिकाणी गेल्या 2013 पासून नियमित माघी गणेशोत्सव होतो. यंदा तिथं शिवमहालाचा देखावा साकारण्यात आला आहे. कामाठीपुऱ्यातील दोन ते तीन गल्लीत रेड लाईट एरिया आहे. त्या भागातील महिलांवर महिलांवर अनेक बंधनं असतात. त्या स्वतःच्या मर्जीने कुठेही जाऊ शकत नाही. त्याचबरोबर हा एरिया त्यांच्यासाठी सर्व काही असतो. अशात गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे त्यांच्यासाठी घरी आलेला एक पाहुणा असतो. त्याचं पाहुण्याचं मनोभावे स्वागत करण्यासाठी त्या गणेश भक्तीत मग्न होतात. बाप्पाच्या पूजेपासून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा त्या पुढाकार घेतात. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व त्याचबरोबर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला देण्यासाठी निरोप देण्यासाठी या महिला बाप्पाच्या भव्य मिरवणुकीत सहभागी होतात. बालगणेशाची एकमेव मूर्ती, बाप्पाच्या पायावर मुलांना झोपवण्याची आहे प्रथा, Video स्वयंभू मूर्ती येथील रहिवाशांच्या मनात 2005 पासून गणेशोत्सव सुरू करण्याचा विचार होतो. पण, 2013 सालापासून हा उत्सव सुरू झाला. येथील मूर्ती स्वयंभू आहे. कोणीही ही मूर्ती खरेदी केलेली नाही. ही मूर्ती एकाच रुपामध्ये दरवर्षी इथं विराजमान होते, अशी माहिती अखिल कामाठीपुरा माघी गणेशोत्सव मंडळाचे सदस्य भास्कर परब यांनी दिली. गेल्या अकरा वर्ष हे मंडळ विविध प्रकारचे देखावे सादर करतात. बाजीराव मस्तानी शिवपार्वती मंदिर अयोध्येचा राम मंदिर असे दरवेळेस वेगवेगळे देखावे सादर केले जातात. यंदा मंडळाने शिव महल बनवला असून राधाकृष्ण मंदिराची खास आरास केली आहे.
माघी गणेशोत्सवानिमित्त दहा दिवस मंडळात विविध सांस्कृतिक क्रीडा मनोरंजनाचे कार्यक्रम त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर दरवर्षी अनेक अभिनेते-अभिनेत्री इथं दर्शनासाठी येतात. संपूर्ण जगभरात कामाठीपुरा प्रसिद्ध आहे. येथील महिलांकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. हा गणेशोत्सव संपूर्ण कामाठीपुरा एकत्र येऊन साजरा करतो. कामाठीपुरा मधील राहणाऱ्या महिलांना एक दिवस आमंत्रित करून खास आरतीचा मान देखील दिला जात असल्याचं परब सांगतात. मंडळांमध्ये या महिलांचा देखील सहभाग आहे,’ अशी माहिती परब यांनी दिली.