JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / लग्न जुळण्यात येत आहेत अनंत अडचणी? कार्तिक पौर्णिमेला करा हे 4 सोपे ज्योतिषीय उपाय

लग्न जुळण्यात येत आहेत अनंत अडचणी? कार्तिक पौर्णिमेला करा हे 4 सोपे ज्योतिषीय उपाय

स्त्री किंवा पुरुषाच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर या दिवशी देवतांना प्रसन्न करण्यासाठी काही धार्मिक उपाय करणे फायदेशीर ठरते, ज्यामुळे विवाहइच्छुकांना लाभ होईल.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 नोव्हेंबर : कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू पौराणिक श्रद्धेनुसार, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला आणि त्याचे स्वर्ग देवतांना दान दिले आणि या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार धारण करून पृथ्वीवरील प्रलयांपासून जीव वाचवले. या सर्व धार्मिक गोष्टींमुळे या दिवसाला देव दीपावली किंवा देव दिवाळी असेही म्हणतात. देव दिवाळीला सर्व देवी-देवता पृथ्वीतलावर येतात, असे मानले जाते. या दिवशी केलेले ज्योतिषीय उपाय पुरुषाच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करू शकतात. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून त्या उपायांबद्दल जाणून घेऊया. हिंदू धर्मात असे मानले जाते की, देव दिवाळीला सर्व देवी-देवतांचे पृथ्वीवर आगमन होते. स्त्री किंवा पुरुषाच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर या दिवशी देवतांना प्रसन्न करण्यासाठी काही धार्मिक उपाय करणे फायदेशीर ठरते, ज्यामुळे विवाहइच्छुकांना लाभ होईल. 1. दीप दान एखाद्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुरू होण्यापूर्वी सतत अडथळे येत असतील, जसे लग्न ठरल्यानंतर मुहूर्त न मिळणे किंवा काही कारणाने लग्न मोडणे इ. यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घराजवळील तलाव किंवा नदी-घाटावर जाऊन आणि दिवा दान करा किंवा दीपप्रज्वलित करा. याशिवाय घराच्या मुख्य ठिकाणी दिवे लावावेत, असे केल्याने लवकरच तुमच्या विवाहाचा योग तयार होईल. 2. तुळशी पूजन हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करावी. तुळशीमध्ये सर्व देवी-देवता वास करतात असे मानले जाते, त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने सर्व देवी-देवतांची पूजा होते आणि विवाह जुळू लागतात. तसेच, तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे तिची पूजा केल्याने लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. 3. गंगाजल स्नान तुमच्या वैवाहिक जीवनात सतत अडथळे येत असतील तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान करताना पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकावेत. असे मानले जाते की, या उपायाने जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात.

4. हळदीचा टिळा - कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला हळद अर्पण करावी आणि या हळदीचा टिळा तिच्या कपाळावर लावावा. असे केल्याने भाग्य लाभते. सोबतच विवाह जुळायला सुरुवात होते. याशिवाय या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिकही काढावे. हे वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या