नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : कृष्ण जन्माष्टमी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी रोहिणी नक्षत्रात बाळकृष्णाचा जन्म झाला, असे म्हणतात. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी गुरुवार 18 ऑगस्ट 2022 रोजी आहे. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक कथा आणि श्रद्धा आहेत. आई यशोदा तिच्या बाळकृष्णाला खूप साज चढवायची. यापैकी एकाच्या मुकुटावर नेहमी मोराचे पंख असायचे. लहानपणापासून डोक्यावर मोरपंख लावून यशोदा आई कृष्णाला सजवायची. शास्त्रानुसार, श्री कृष्ण हे भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक आहेत, ज्या अवतारात त्यांनी मोरपंख मुकुट परिधान केला होता. कृष्णाच्या मुकुटावर नेहमी मोरपंख का असते? त्यामागे अनेक कथा आहेत. भगवान श्रीकृष्ण मोरपंखी मुकुट धारण करण्याविषयीची माहिती दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंग यांच्याकडून जाणून घेऊया. मोरपंखी मुकुट परिधान केलेल्या कृष्णाची कथा - राधाराणीचे निशाण - एका आख्यायिकेनुसार, कृष्ण आणि राधा नृत्य करत असताना एका मोराचे पंख जमिनीवर पडले. श्रीकृष्णाने ते मोरपंख उचलून आपल्या मुकुटावर घातले. राधाने श्रीकृष्णाला याचे कारण विचारले असता ते म्हणाले, या मोरांच्या नृत्यात त्यांना राधाचे प्रेम दिसते. मोराच्या पंखातील सर्व रंग - भगवान श्रीकृष्णाचे जीवन एकसारखे नव्हते. त्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे अनेक रंग आणि विविध भाव होते. मोराच्या पिसामध्ये जसे अनेक रंग असतात, त्याचप्रमाणे बाळकृष्णाच्या जीवनात अनेक रंग होते. मोराची पिसे हे जीवन खूप रंगीबेरंगी असल्याचा संदेशही देतात. पण याकडे जर दुःखी मनाने बघितले तर आयुष्य बेरंग दिसेल आणि आनंदाने बघितले तर आयुष्याला मोराच्या पिसासारखा रंग दिसेल. हे वाचा - Krishna Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता? जन्माष्टमीची पूजा आणि व्रत कसे करावे? हे देखील कारण - मोर हा एक पवित्र पक्षी मानला जातो, म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याचे पंख आपल्या डोक्यावर परिधान करत. पंडितजी म्हणतात की, श्रीकृष्णानेही मोराची पिसे घातली होती, कारण त्यांच्या कुंडलीत काल सर्प दोष होता. तो दोष मोराच्या पिसाने निघून जातो, म्हणूनच कृष्णाने नेहमी मोराची पिसे आपल्याजवळ ठेवली. हे वाचा - Janmashtami 2022: म्हणून पंचामृत सर्व महत्त्वाच्या पूजेमध्ये वापरतात, श्रीकृष्णाशी आहे असा संबंध (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)