विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 17 फेब्रुवारी : महाशिवरात्र म्हणजे महादेवाची उपासना करण्याचा दिवस. या दिवशी सकाळपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी असते. महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीला उपवास करण्याची पद्धत असल्यानं घरोघरी उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. त्याचबरोबर या दिवशी अनेक जण भांग देखील खातात. भांग खाणे हा महादेवाचा प्रसाद आहे, असा त्यांचा दावा असतो. नाशिकमधील महंत अनिकेत शास्त्री यांनी याबाबत शास्त्रामधील सत्य सांगितलं आहे. काय सांगतं शास्त्र? ‘ध्यानमग्न,समाधीस्थ आणि त्याचबरोबर अतिशय रुद्र, विनाशक, महादेव तांडव असे विविध स्वरूप भगवान शंकराचे आहे. महादेवाचे सर्वोच्च तिथी आणि पूजा अर्चना करण्यासाठी महाशिवरात्र हा सर्वोच्च मुहूर्त आहे. महाशिवरात्रीला रात्रभर जागून महादेवाची प्रार्थना केली जाते. Mahashivratri 2023 : उपवासासाठी भगर खरेदी करताना सावधान, धोका टाळण्यासाठी पाहा Video अकालमृत्यू, अपमृत्यू, दूर मरण या सर्वांवर विजय मिळावा. आपल्याला दिर्घाआयुष्य मिळावं या हेतूनं ही प्रार्थना केली. त्याचवेळी या पूजेच्या निमित्तानं गांजा, भांग खाण्याचीही प्रथा आहे. हा महादेवाचा प्रसाद आहे असं सांगत याबाबत इतरांनाही आग्रह केला जातो. पण कोणत्याही शास्त्रामध्ये भांग खाण्याचं समर्थन करण्यात आलेलं नाही.’ असं अनिकेत शास्त्री यांनी स्पष्ट केल आहे. भांग खात असाल तर… ‘महादेवानं भांग गांजा विष आधी हे दुष्ट प्रवृत्ती किंवा दुष्ट पदार्थांना भूतलावावरून नष्ट करा असं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी विष प्राशन केलं. तुम्ही महादेवाच्या नावावावर भांग किंवा गांजा घेत असाल तर विष देखील घेणार का? तसं कुणीही करत नाही. महादेवाचे कट्टर भक्त म्हणून भांग किंवा गांजाचं सेवण करणं चुकीचं आहे. महादेवाच्या गळ्यात का आहे नर मुंडमाला? जाणून घ्या पौराणिक कथा धर्मशास्त्राचं, संस्कृतीचं विद्रुपीकरण थांबलं पाहिजे. सर्वांनी जास्तीत जास्त शुद्ध पद्धतीनं महादेवाची उपासना करावी. कोणतेही नशा-पाणी करू नका. धर्मशास्त्रात या प्रकारचं काहीही सांगितलं नाही,’ अशी महत्त्वाची माहिती अनिकेत शास्त्री यांनी दिली आहे.