JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / घरात लक्ष्मीचा फोटो असून उपयोग काय? या दिशांना नसेल तर आर्थिक नुकसानच!

घरात लक्ष्मीचा फोटो असून उपयोग काय? या दिशांना नसेल तर आर्थिक नुकसानच!

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील लक्ष्मीच्या प्रतिष्ठापनेचे स्थान.

जाहिरात

लक्ष्मीचा फोटो घरात कोठे असावा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जानेवारी : हिंदू धर्मात माता लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवता मानलं जातं. ज्या व्यक्तीवर, कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा असते, त्याच्या आयुष्यात धन आणि धान्याची कमतरता नसते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील लक्ष्मीच्या प्रतिष्ठापनेचे स्थान. घरात लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती योग्य दिशेला असावी. वास्तुशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या स्थानाविषयी अनेक विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिची मूर्ती घरात योग्य दिशेला ठेवावी. लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती कोणत्या दिशेला लावणे शुभ आहे ते जाणून घेऊया. देवी लक्ष्मीच्या मूर्ती/फोटोसाठी योग्य दिशा - वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा फोटो दक्षिण दिशेला लावणे शुभ नाही, यामुळे घरातील सुख-समृद्धी नाहीशी होते आणि गरिबी येते, असे मानले जाते. याशिवाय देवी लक्ष्मीचा फोटो उभ्या स्थितीतही लावू नये, या स्थितीतील फोटोमुळे ती एका ठिकाणी थांबत नाही, त्यामुळे लक्ष्मीच्या निवासासाठी तिचा फोटो बसलेल्या स्थितीत लावणे भाग्यशाली ठरेल. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावा, यामुळे घरात सुख-समृद्धी, संपत्ती, धान्य आणि वैभव टिकून राहते. व्यवसायात नफा राहिल्यानं जीवनात प्रगती होईल.

या गोष्टी लक्षात ठेवा - वास्तुशास्त्रानुसार एका ठिकाणी लक्ष्मीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती बसवू नयेत, असे करणे अशुभ आहे. लक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा फोटोजवळ सुंदर रांगोळी काढा. देवी लक्ष्मीची मूर्ती उजव्या बाजूला गणपतीसोबत किंवा डाव्या बाजूला विष्णूसोबत ठेवावी. सकाळ-संध्याकाळ भक्तीभावे लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे वरदान मागा. हे वाचा -  या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या