फुलांमध्ये सुगंध असतो, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 19 जून : हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, नियमितपणे देवाची पूजा केल्यास मनाला शांती मिळते. यासाठी लोक अनेक प्रकारचे धार्मिक विधी, पूजा-हवन, आरती, व्रत करतात. पूजेत परमेश्वराला फूलं अर्पण केली जातात. असं म्हणतात की, फुलांशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे आज आपण पाहूया देवाला फूल का अर्पण केलं जातं. उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील प्रसिद्ध कथाकार पवन दास शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलांमध्ये सुगंध असतो, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच फुलांचा वापर देवपूजेत केला जातो. तर, पूजेच्या वेळी देवाला फूलं अर्पण केल्यास आपल्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मात विविध देवांना विविध फूलं प्रिय असतात असं सांगितलं जातं. ती कोणती ते पाहूया.
गणपती कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीस बाप्पाची पूजा केली जाते. बाप्पाला दुर्वा प्रिय आहे. शिवाय इतर सर्व प्रकारची फूलंही आपण गजाननाला अर्पण करू शकतो. Ajinkya Raut: मन उडू उडू झालं नंतर ‘या’ मालिकेत झळकणार दिपूचा इंद्रा; फर्स्ट लुक आला समोर विष्णू भगवान विष्णूला तुळस सर्वाधिक प्रिय आहे. मात्र त्यासोबतच कमळ, केवडा, चमेली आणि चंपादेखील आवडते. शंकर महादेवाला भांग, धोतरा, बेलपात्र सर्वाधिक प्रिय आहे. याव्यतिरिक्त पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करणं शुभ मानलं जातं. लक्ष्मी लक्ष्मीला धनदेवता मानलं जातं. जिथे लक्ष्मीचा वास असतो ते घर धनसंपत्तीने समुद्ध असतं. लक्ष्मी मातेला कमळ पुष्प प्रिय आहे. सूर्य देव भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी हिबिस्कसचं फूल, लाल कमळ, कनेर अर्पण केलं जातं. तसेच सूर्याला झेंडूचं फूल अर्पण करणं शुभ मानलं जातं. हनुमान हनुमानाला कलियुगाचा राजा म्हटलं जातं. त्यांना प्रसन्न करण्यासाठी लाल गुलाब अर्पण करावा. श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी कुमुद, मालती ही फुलं अर्पण करावीत. गौरी गौरी देवीला लाल रंगाची फूलं सर्वाधिक प्रिय असतात. दुर्गा दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी हिबिस्कस आणि गुलाबासारखी लाल रंगाची फूलं अर्पण करावी. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)