विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 5 एप्रिल : श्रीरामाचा परमभक्त असलेल्या हनुमानाची जयंती यावर्षी गुरुवार 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्तानं हनुमानाचा जन्म नेमका कुठं झाला? याबाबतची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. देशभरात अनेक ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जातो. शास्त्र,धर्मग्रंथ यांच्या माहितीनुसार जन्म कुठे झाला आहे.या संदर्भात सत्य काय आहे? याची माहिती नाशिकमधील धर्मशास्त्र अभ्यासक महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी दिलीय. काय आहे सत्य? किष्किंधा, हरियाणामधील कनखल, गुजरातमधील डांग, हरिद्वारमधील शेश्याद्री पर्वत,तिरुपती येथील अंजनाद्री पर्वत,अशा अनेक ठिकाणी हनुमान जन्माचा दावा केला जातो. याबाबत वेद पुराण, ब्रम्ह पुराण,ब्रम्हांड पुराण,शिव पुराण,रामायण आणि गोदा माहात्म्य,नवनाथ सार अशा ग्रंथांचे दाखले पाहणे आवश्यक आहे. या दाखल्याच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचं अंजनेरी पर्वत हेच हनुमानाचे जन्मस्थान आहे. रामायण हा इतिहास ग्रंथ आहे. पुराण हे स्मृती ग्रंथ आहे. धर्मशास्त्र हे श्रुती,स्मृती, पुराण यावर चालतं. ते इतिहासावर चालत नाही. जवळपास 200 रामायण उपलब्ध आहेत. वाल्मिकी रामायण,तुलसी रामायण,आनंद रामायणाबरोबर इंडोनेशीया,जपान,थायलंड येथील रामायण वेगवेगळे आहे. त्यामुळे मत-मतांतरही मोठ्या प्रमाणात आहे. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुती माहिती आहेत का? घरबसल्या घ्या सर्वांचं दर्शन, Photos पुराण हे महर्षी वेद व्यासांनी गणपतीच्या हस्ते लिहिलेलं आहे. ब्रम्ह पुराणानुसार अंजनेरी पर्वतावरच चैत्र शुद्ध पौर्णिमेला सकाळी 6 वाजता हनुमानाचा जन्म झाला आहे.’ अशी माहिती धर्मशास्त्र अभ्यासक महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी दिलीय. हनुमान जन्मोत्सव, जयंती नाही जयंती हा शब्द वारलेल्या लोकांसाठी असतो. हनुमान हे सप्त चिरंजीव आहेत,त्यामुळे ते अजूनही आपल्यात आहेत,ही आपल्या धर्म शास्त्राची संकल्पना आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥’ अर्थात् : अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य और भगवान परशुराम हे सर्व चिरंजीव आहे.
हे सात कायम चिरंजीव आहेत,त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. जयंती किंवा पुण्यतिथी नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यावं,’ असं आवाहनही अनिकेत शास्त्री यांनी यावेळी केलं.