JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Guru Purnima 2023 : गुरुतत्त्व म्हणजे काय? जाणून घ्या स्वामी सेवा कशी करावी ?

Guru Purnima 2023 : गुरुतत्त्व म्हणजे काय? जाणून घ्या स्वामी सेवा कशी करावी ?

Guru Purnima 2023 : गुरू पौर्णिमेला गुरु सेवेचं महत्त्व सांगितलं आहे. गुरुतत्त्व आणि गुरू सेवेबद्दल अधिक जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 3 जुलै: ‘गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष। गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष’।। गुरुच्या परिस स्पर्षाशिवाय मनुष्यातील अज्ञान रुपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही. गुरुच्या सहवासाशिवाय सत्य-असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य, काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. गुरु पौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामीसेवा करतात. ती स्वामी सेवा कशी करावी ? याविषयी पुणे येथील स्वामी भक्त मधू जोशी यांनी माहिती दिली आहे. कशी कराल स्वामी सेवा ? रोजच्या रोज दुपारच्या जेवणात सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला सुरुवात करा. आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ जप हा अकरा माळी करायला खूप कमी वेळ लागतो आणि जर तुम्हाला अकरा माळी सुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी. आता बघा अकरा नाहीतर एक तर तुम्हाला जमेलच. त्यानंतर दुसरं आहे तारक मंत्र 1 वेळेस बोलावा बस तुम्हाला हे दोन कामं करायची आहेत. या दोन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या किंवा म्हणायच्या आहेत, असे जोशी सांगतात.

नैवेद्य दाखवितांना हे करा नैवद्य दाखवितांना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करुन त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखविण्यापूर्वी व दाखविल्यानंतर मुजरा करावा. नैवद्यावर तुळशीच्या पानाने ॐ प्राणाय स्वाहा.. म्हणत नैवेद्य दाखवावा. दोन्ही वेळेस ( सकाळ व सायंकाळी ) नैवेद्य दाखविल्या शिवाय जेवन करु नये. रात्री ताजे जेवन तयार केले नसल्यास महाराजांच्यापुरता भात करुन दुध भात अथवा दुध, साखर, पोहे यांचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवितांना देव्हा-यात निरंजन जळत असावी. निदान उदब्बती तरी असावी. महाराज अथवा इत्तर देव अग्नी साक्षी शिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत, असे जोशी सांगतात. Guru Purnima 2023 : गुरुपौर्णिमेला करा हे उपाय; गुरु दोषातून मिळेल मुक्ती नवीन सेवेकरी असाल तर कशी सेवा कराल ? तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरु केले असेल तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे. मित्रांनो दररोज संध्यकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी. समजा सकाळी 7:30 वाजता किंवा संध्यकाळची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी. स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत ह्या अध्यायाचे अध्ययन करावे. अध्ययन करताना दररोज 3 अध्याय वाचावेत. कारण त्यात 21 अध्यायने असतात. जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्यायने होतील व पुढील आठव्यात पुन्हा नव्याने सुरु करू शकाल. हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचे 11 माळी जप करावा. हे न चुकता रोज करावे, अशी माहिती जोशींनी दिली. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या