JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ganesh Chaturthi 2022 : घराच्या घरी बनवा गणपती बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती, फॉलो करा या सोप्या टिप्स

Ganesh Chaturthi 2022 : घराच्या घरी बनवा गणपती बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती, फॉलो करा या सोप्या टिप्स

गणेश चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या धूमधडाक्याचा पर्यावरणाला खूप त्रास सहन करावा लागतो, हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी पूजेसाठी पर्यावरणपूरक मूर्तींची निवड केली पाहिजे.

जाहिरात

बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी टिप्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : गणपती उत्सव हा वर्षातील तो काळ असतो, जेव्हा सर्वजण आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी गणपतीची मूर्ती आणतात. गणेश चतुर्थी सणाची धूम दहा दिवस संपूर्ण भारतभर ऐकू येते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा विशेष उत्साह असतो. गणेश चतुर्थीला देवाची स्थापना करण्यासाठी घरोघरी अनेक प्रकारची तयारी केली जाते. गणपती बाप्पाच्या रोजच्या पूजेच्या आणि नैवेद्य, प्रसादाच्या तयारीपासून ते सजावटीपर्यंत सर्वांची विशेष काळजी घेतली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाजारपेठ सुशोभिकरणाच्या वस्तू म्हणजेच डेकोरेशनचे साहित्य आणि गणपतीच्या मूर्तींनी सजलेली असते. दहा दिवसांनी गणेश चतुर्थीला मूर्ती विसर्जन होते. त्यामुळे कुठेतरी पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अशा परिस्थितीत पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी पार पाडून पूजेसाठी केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचीच निवड करावी. आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी इको फ्रेंडली मूर्ती बनवू शकता. घरच्या घरी अशा प्रकारे बनवा इको फ्रेंडली मूर्ती - घरच्या घरी इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही बाजारात सहज उपलब्ध असलेल्या शाडू मातीचा वापर करू शकता. - मूर्ती बनवण्यासाठी आधी एक छान चौकोनी लाकडाचा तुकडा निवडा ज्यावर मूर्तीची स्थापना केली जाईल. - मूर्ती बनवण्यासाठी माती स्वच्छ करून त्यात पाणी घालून माती पिठासारखी चांगली मळून घ्यावी.

यंदाच्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाला द्या भेट, जाणून घ्या मंदिराची सर्व माहिती

- चिकणमाती थोडा वेळ विश्रांतीसाठी ठेवा आणि सुमारे 1 तासानंतर मातीपासून मूर्तीचा आकार तयार करा. - मूर्तीला आकार दिल्यानंतर मूर्तीमध्ये एक लहान सोंड आणि हात-पाय तयार करून जोडा आणि सुकण्यासाठी सोडा. - जेव्हा मूर्ती पूर्णपणे सुकते तेव्हा तुम्ही तिला वॉटर कलरने रंगवू शकता. हा रंग पक्का होण्यासाठी यात फेव्हिकॉल टाकता येते. - मूर्तीला रंगांनी सजवल्यानंतर फुलांच्या माळा आणि मोत्याचे छोटे दागिने घालून बाप्पाची मूर्ती सजवावी.

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला 3 शुभ योग आणि 1 विशेष योगायोग, दोन दिवसांचा सर्वार्थ सिद्धी योग

संबंधित बातम्या

युट्युबवर Anand Art and Craft Studio ने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावरून तुम्हाला बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती कशी बनवायची याची कल्पना येईल. https://www.youtube.com/watch?v=gbhBl0qML08 यंदा इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवून तुम्हीदेखील पर्यावरणाची हानी होण्यापासून रोखू शकता..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या