जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / यंदाच्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाला द्या भेट, जाणून घ्या मंदिराची सर्व माहिती

यंदाच्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाला द्या भेट, जाणून घ्या मंदिराची सर्व माहिती

यंदाच्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाला द्या भेट, जाणून घ्या मंदिराची सर्व माहिती

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाच्या (महाराष्ट्रातील गणेशाची आठ रूपे) प्रतिमा कोरलेल्या आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट : मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर श्रीगणेशाचे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे प्रभादेवी, मुंबई येथे आहे. हे मंदिर लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे सध्या भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाच्या (महाराष्ट्रातील गणेशाची आठ रूपे) प्रतिमा कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या आतील छतावर सोन्याचा मुलामा चढवलेला असून मध्यवर्ती गणेशाची मूर्ती आहे. परिसरात हनुमानाचे मंदिरही आहे. मंदिराच्या बाह्यभागात घुमट आहे जो संध्याकाळी अनेक रंगांनी उजळतो आणि ते रंग दर काही तासांनी बदलत राहतात. घुमटाच्या अगदी खाली श्री गणेशाची मूर्ती आहे. खांबांवर अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. श्री सिद्धिविनायक मंदिर लाईव्ह लिंक   गणेश चतुर्थी - वेळापत्रक (इतर दिवसांचे वेळापत्रक वेगळे असते, त्याची मंदिराच्या संकेतस्थळावर माहिती मिळेल.) काकड आरती - पहाटे 5.30 ते 6.00 वा. श्री दर्शन - सकाळी 6.00 ते सकाळी 7.30. अभिषेक, नैवेद्य आणि पूजा आरती – सकाळी 7.30 ते दुपारी 1.00 वा. श्री दर्शन – दुपारी 1.00 ते संध्याकाळी 7.20 वा. संध्याकाळची आरती : 7.30 रात्री 8.00 श्री दर्शन – रात्री 8.00 ते 9.50 शेजारती - रात्री 9.50 (शेजारतीनंतर मंदिराचे गाभारा दरवाजे बंद राहतात) सकाळी 7.30 ते दुपारी 1.00 पर्यंत मुख्य मंदिरात भाविकांना प्रवेश नाही. दुपारी 1.00 नंतर. दररोजच्या वेळापत्रकानुसार दर्शन मिळेल. सिद्धीविनायक मंदिराचा पत्ता - मॅप लिंक मंदिराला कसे पोहचाल - ठिकाण                           हवाई मार्गाने          रस्त्याने           रेल्वेने नवी दिल्ली ते मुंबई -         2.0 तास             36.0 तास        16.0 तास - पुणे ते मुंबई -                     1.0 तास             3.0 तास           2.0 तास - कोलकाता ते मुंबई -            2.0 तास           43.0 तास          35.0 तास - चेन्नई ते मुंबई -                 2.0 तास            23.0 तास         21.0 तास - बंगलोर ते मुंबई -               2.0 तास             17.0 तास          23.0 तास - हैदराबाद ते मुंबई -             1.0 तास              14.0 तास          13.0 तास - अहमदाबाद ते मुंबई -          1.0 तास             9.0 तास            6.0 तास - खासगी दर्शन बुकींग (Personal Darshan Booking) - खासगी दर्शन बुक करण्याची देखील मंदिर समितीकडून सोय करण्यात आली आहे यासाठी मंदिराच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा या लिंकवर क्लीक करून दर्शन बुक करू शकता. यासाठी अगोदर नाव नोंदणी करून आपला पासवर्ड तयार करावा लागेल. विशेष दिवस - विनायक चतुर्थी 2022 दिवस                 तारीख                                    योग गुरुवार             06 जानेवारी 2022 शुक्रवार            04 फेब्रुवारी 2022          श्रीगणेश जयंती रविवार            06 मार्च 2022 मंगळवार         05 एप्रिल 2022            अंगारक योग बुधवार            04 मे 2022 शुक्रवार           03 जून 2022 रविवार           03 जुलै 2022 सोमवार          01 ऑगस्ट 2022 गुरुवार           29 सप्टेंबर 2022 शुक्रवार         28 ऑक्टोबर 2022 रविवार         27 नोव्हेंबर 2022 सोमवार        26 डिसेंबर 2022 सेलेब्रिटींचा बाप्पा - चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मुंबईतील प्रसिद्ध गणपतीचं दर्शन घेतात. मग त्यांचा नवीन एखादा चित्रपट असो किंवा वाढदिवसाचं कारण असो. हे कलाकार सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पापुढे डोकं टेकवून आशीर्वाद घेतात. हे कलाकार भक्तिभावाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दिसतात. काही कलाकारांनी तर अनवाणी चालत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. कोणकोणत्या कलाकारांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे, त्याविषयीची काही माहिती » सेलेब्रिटींचा लाडका बाप्पा सिद्धीविनायक ट्रस्टकडून केली जाणारी कामे, पूजा, उपक्रम - सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट आपल्या संसाधनांचा उपयोग मुख्यत्वे धार्मिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आणि इतर उपक्रम अशा चार प्रकारातील उपक्रमांवर करते. माघी आणि भाद्रपद गणेशोत्सवासारखे सण आणि उत्सव साजरे करणे, माघी आणि भाद्रपद गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम 1. वैद्यकीय उपक्रम जसे की डायलिसिस केंद्र, वैद्यकीय सहाय्य, उपकरणे आणि सरकारला पायाभूत सुविधा देणे. महापालिका रुग्णालये, आरोग्य, रक्तदान यांसारखी शिबिरे घेणे. नेत्र तपासणी व ऑर्थोपेडिक शिबिर 2. दृष्टिहीनांसाठी अल्ट्रामॉडर्न लायब्ररी आणि वाचन कक्ष, डिजिटल लायब्ररी आणि लायब्ररी यासारखे शैक्षणिक उपक्रम. 3. विद्यार्थी आणि संस्थांसाठी बुक बँक योजना. पावसाचे पाणी साठवणे, सौरऊर्जा वापरणे, पर्यावरणपूरक सण साजरे करणे आणि फुलांच्या कचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करणे यासारखे निसर्ग संवर्धन उपक्रम. महाशिवरात्री पूजा, अंगारकी चतुर्थी पूजा, श्री. रामनवमी पूजा, माघ महोत्सव, गणेशोत्सव, गुढीपाडवा, नवरात्रौत्सव, इयत्ता 12 वी चा कुंभभिषेक सत्कार युवा कलाकारांसाठी लिटिल हार्ट्स मॅरेथॉन नृत्य कार्यक्रम, दिवाळी पहाट, पाणी प्रकल्पांसाठी देणगी, इको फ्रेंडली गणेश चित्रकला स्पर्धा, जागतिक अपंग दिन, बालदिन साजरा, एकतेची शपथ, वैद्यकीय शिबिर, नेत्ररोग शिबिर, अस्थिव्यंग शिबिर, विद्यार्थ्यांसाठी वाडिया हॉस्पिटलमधील मेडिकल वॉर्ड सिद्धीविनायक अ‌ॅप (Siddhivinayak App) - श्री सिद्धिविनायक मंदिर अॅप हे iOS आणि Android नेटिव्ह मोबाइल अॅप्लिकेशन आहे. भक्तांना यामुळे थेट दर्शन, भेटीची वेळ/दर्शन बुक करण्यास, व्हिडिओ कॉलद्वारे पूजा करण्यास, त्यांचे बुकिंग पाहण्यास, पेमेंट गेटवे, पैसे दान करण्यास आणि त्यांच्या देणग्या पाहण्यासाठी उपयुक्त आहे. हे अॅप इंग्रजी, मराठी आणि हिंदी या 3 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या लिंकवर अ‌ॅप उपलब्ध आहे - दान (Donation) - श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर (प्रभादेवी) ट्रस्टला देणगी देण्याचे अनेक पर्याय आहेत. चेक आणि डिमांड ड्राफ्ट, कॅश कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स आणि इंटरनेट बँकिंग (नेट बँकिंग) यापैकी कोणताही पर्याय वापरून मंदिरा देणगी देता येते. मंदिराच्या आवारात ठेवलेल्या हुंड्यांमध्ये रोख जमा करू शकता किंवा मंदिराच्या आवारातील पूजा बुकिंग काउंटरवर किंवा चौथ्या मजल्यावरील लेखा कार्यालयात (दान विभाग) पैसे दान करता येतात. रोख रक्कम कोणत्याही व्यक्तीच्या हाती देऊ नये. चेक, डिमांड ड्राफ्ट आणि पे ऑर्डर कोणत्याही चलनात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या नावे कराव्या लागतील आणि मंदिराच्या आवारातील पूजा बुकिंग काउंटरवर किंवा चौथ्या मजल्यावरील लेखा कार्यालयात (दान विभाग) द्याव्या लागतील. कार्यालय देणगीची पावती देईल. देशांतर्गत आणि विदेशी देणग्यांसाठी वेगवेगळे बँक खाते आहे. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लीक करा - अशाप्रकारे आपण देशातील प्रसिद्ध सिद्धीविनायकाच्या मंदिराची माहिती जाणून घेतली. यंदाच्या गणेश चतुर्थीला कोरोना नियमावली शिथील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिरात भाविक प्रत्यक्ष श्रीगणेशाचे दर्शन घेऊ शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात