JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / तब्बल 50 वर्ष एकही वाक्य बोलले नाहीत बाबा; तरीही प्रत्येक शब्द होतो खरा

तब्बल 50 वर्ष एकही वाक्य बोलले नाहीत बाबा; तरीही प्रत्येक शब्द होतो खरा

या बाबांचं वय जवळपास 100 वर्ष आहे. महत्त्वाचं म्हणजे मागील 50 वर्षांपासून त्यांनी कडक मौन व्रत पकडलंय.

जाहिरात

त्यांच्या हावभावावरून भाविक त्यांचं म्हणणं समजून घेतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धर्मवीर शर्मा, प्रतिनिधी गुरुग्राम, 30 जून : एखाद्याने म्हटलेली एखादी गोष्ट खरी ठरली तर आपण त्याला काळ्या जिभेचा म्हणतो. मात्र हा झाला मस्करीच्या विषय, परंतु जगात असे अनेक लोक असतात ज्यांनी बोललेलं वास्तविकत: खरं होतं. हरियाणाच्या गुरुग्राममध्येही असे एक बाबा आहेत, ज्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. या बाबांचं वय जवळपास 100 वर्ष आहे. महत्त्वाचं म्हणजे मागील 50 वर्षांपासून त्यांनी कडक मौन व्रत पकडलंय. तब्बल 50 वर्ष ते एकही शब्द बोललेले नाहीत. मात्र न बोलताच त्यांचे सगळे शब्द खरे ठरतात. याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. त्यांच्या हावभावावरून भाविक त्यांचं म्हणणं समजून घेतात.

गुरुग्रामपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या अरावली डोंगरात राधाकृष्णाचं एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरातील बाबांना ‘बक्सर बाबा’ असं म्हटलं जातं. हेच बाबा 50 वर्षांपासून मौन व्रतावर आहेत. ‘हम दिल दे चुके सनम…’ हा तर निघाला खरा अजय देवगण! बायकोचं लावलं प्रियकराशी लग्न त्यांनी दिलेला प्रत्येक आशीर्वाद खरा ठरतो. त्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. दिवसभरात असा एकही क्षण नसतो, जेव्हा बाबांजवळ एखादा भाविक नसतो. दरम्यान, पुराच्या पाण्यात स्थापन झालेल्या या मंदिरावर ग्रामस्थांचा मोठा विश्वास आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या