JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी शुक्रवारी या गोष्टी करा दान; इच्छित कामे सहज होतील पूर्ण

देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी शुक्रवारी या गोष्टी करा दान; इच्छित कामे सहज होतील पूर्ण

शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत केल्यानं भक्तांना तिचा आशीर्वाद मिळतो. तिची पूजा केल्यानं देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करावी.

जाहिरात

शुक्रवारचे लक्ष्मीपूजन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे : हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार जो कोणी शुक्रवारी लक्ष्मीची भक्तीभावाने पूजा करतो, त्याच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मी नेहमी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार, माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. तिच्या कृपेनं माणसाच्या जीवनात ऐश्वर्य, वैभव आणि यश प्राप्त होते. शुक्रवारी विधीनुसार लक्ष्मीची पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. लक्ष्मी पूजनाच्या पद्धती जाणून घेऊ. 1. लक्ष्मीचे व्रत ठेवा: ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी सांगितले की, पौराणिक मान्यतेनुसार, शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत केल्यानं भक्तांना तिचा आशीर्वाद मिळतो. तिची पूजा केल्यानं देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करावी. 2. माता लक्ष्मीला तिच्या आवडत्या वस्तू अर्पण करा: कमलगट्टा, कमळाचे फूल, लाल गुलाब आणि पांढरी मिठाई किंवा खीर शुक्रवारी माता लक्ष्मीला अर्पण करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांना धन-संपत्ती वाढवण्याचा आशीर्वाद देते.

3. लक्ष्मी स्त्रोत पाठ करा: शुक्रवारी लक्ष्मी स्त्रोत पाठ केल्यानं धनाची प्राप्ती होते. जर तुमच्याकडेही पैशाची कमतरता असेल आणि तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इंद्रदेवांनी लक्ष्मी स्तोत्राचे पठण केले, असे मानले जाते. घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू; अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या 4. श्री यंत्राची पूजा : श्रीयंत्राची पूजा विधीनुसार शुक्रवारी करावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. शुक्रवारी विधिपूर्वक श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीची पूजा करा, त्यानंतर श्रीसूक्ताचे पठण करा. यामुळे पैशाचे संकट दूर होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. 5. या गोष्टींचे दान करा: कुंडलीतील शुक्र बलवान होण्यासाठी या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा, अत्तर लावा, स्वच्छता ठेवा आणि स्त्रियांचा आदर करा. यासोबतच या दिवशी पांढरे वस्त्र, तांदूळ, तूप, कापूर, साखर, श्रृंगाराचे साहित्य, दही इत्यादींचे दान करणेही अत्यंत लाभदायक मानले जाते. अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या