JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Diwali 2022 : गुलाबाचं एक फूल करेल तुमच्या आर्थिक समस्या दूर; धनत्रयोदशीच्या दिवशी करा हा उपाय

Diwali 2022 : गुलाबाचं एक फूल करेल तुमच्या आर्थिक समस्या दूर; धनत्रयोदशीच्या दिवशी करा हा उपाय

धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची पूजा करून धनसंपत्तीचा आशीर्वाद घेतला जातो. या दिवशी जे लोक कर्जात आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्या लोकांनी काही उपाय करून त्यांच्यी आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑक्टोबर : दिवाळी आली की सर्वांची तयारी सुरु होते. आपल्याकडे दिवाळी हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. डावातील प्रत्येक दिवस आपल्यासाठी उत्सव असतो. वसुबारसपासून सुरु होणाऱ्या दिवाळीमध्ये, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सन असतात. अनेक ठिकाणी धनत्रयोदशीपासून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी सुरु कधीपासूनही झाली तरी दिवाळीतील धनत्रयोदशी या दिवसाला खूप महत्व असते. या दिवशी अनेक लोक सोने करतात. बरीच प्रॉपर्टी किंवा गाडी अशा मोठ्या वस्तूंचीदेखील खरेदी करतात. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची पूजा करून धनसंपत्तीचा आशीर्वाद घेतला जातो. या दिवशी जे लोक कर्जात आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्या लोकांनी काही उपाय करून त्यांच्यी आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.

Diwali 2022 : दिवाळीच्या दिवशी ‘या’ ठिकाणी पणत्या लावणे असते शुभ, अनेक अडचणी होतात दूर

आज आम्ही तुम्हाला असाच एक स्वस्त आणि अगदी सोपा उपाय सांगणार आहोत. इंस्टाग्रामवरील happy_life_astro या चांदेवार एक पोस्ट आहे. त्यानुसार, एक गुलाबाचे फुल तुमच्या आर्थिक समस्या सोडवू शकते. या व्हिडिओमध्ये असे सांगितले आहे की, एक गुलाबाचे फुल घ्या आणि त्यामध्ये एक भीमसेनी कापराचा तुकडा ठेवा. हे कपूर ठेवलेले गुलाबाचे फुल धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी देवघरातील देवी लक्ष्मी आणि गणपती यांच्या चरणामध्ये ठेवा.

संध्याकाळी पूजेच्यावेळी हा गुलाबातील कापराचा तुकडा घेऊन पेटवा. आणि याचा धूप किंवा धूर घरामध्ये पसरावा. देवाजवळ प्रार्थना करा की आपलं आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि धन संपन्नतेचा आशीर्वाद द्यावा. हा उपाय अगदीउ साधा आणि खूप सोपा आहे. हा उपाय तुम्ही धनत्रेआयोदशीच्या दिवशी केल्यास तुम्ही आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल असे या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे.

संबंधित बातम्या

धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेदरम्यान कुबेर मंत्राचा जप करा - ‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये धन-धान्य समृद्धि में देहि दापय स्वाहा.’ धनत्रयोदशीलाही यमराजाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात, विष्णू अंश अवतार आणि आयुर्वेदाचा प्रवर्तक, धन्वंतरी देवाची पूजा करण्याचा नियमदेखील आहे. असे केल्याने आजार दूर राहतात असे म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या