पालखीचे संग्रहित छायाचित्र
पुणे, 10 जून : श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान देहूतून आज 10 जूनला होणार आहे. हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल. 19 दिवसांचा प्रवास करून 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. आज जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. 10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार आहे. देहू-आळंदीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्याचवेळी पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यास पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाली आहे सायंकाळी पाच वाजता पालखी मुख्य मंदिर प्रदक्षिणेसाठी भजणी मंडपातून बाहेर पडेल, त्यानंतर साडेसहाच्या समोर पालखी पहिले मुक्कामासाठी इनामदार वाड्यात जाईल. रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13 जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल.
बुधवार 14 जून लोणीकाळभोर, गुरूवार 15 जूनला यवत, शुक्रवार 16 जून वरवंड, शनिवार 17 जून उंडवडी गवळ्याची, रविवार जून जुने बारामती, सोमवार 19 जून सणसर, मंगळवार 20 जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, बुधवार 21 जून निमगाव केतकी, गुरुवार 22 जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शुक्रवार 23 जून सराटी, शनिवार 24 जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अकलूज येथे होईल. भाग्यवान लोकांना स्वप्नात या गोष्टी दिसतात; नशीब पालटण्याचे ते संकेत असतात रविवार 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार 26 जून रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल. मंगळवार 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल.
बुधवार दि.28 जून रोजी पालखी वाखरी वरून पंढरपूरात दाखल होतील. दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर, नवीन इमारत येथे होईल. बुधवार 29 जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल. सूर्याची मिथुन संक्राती या 4 राशींना तापदायक; जपून करा कामं, फसवले जाल गुरूवार दि. 29 जून ते सोमवार दि. 3 जुलै 2023 रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे. 3 जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरूवात करेल. पालखी परत येताना 10 दिवसांचा प्रवास करून 13 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथे थांबेल.