1. दागिने घातल्याचे स्वप्न स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात स्वतःला दागिने घातलेले पाहिले असेल तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमचे लवकरच लग्न होणार आहे किंवा काही दिवसात तुमच्यासाठी चांगले नाते-संबंध निर्माण होणार आहेत.
2. सर्व आलबेल, आनंदी वातावरण पाहणं स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला एखादी व्यक्ती नाचताना किंवा आनंदी होताना दिसली तर ते तुमच्या घरात शहनाई वाजणार असल्याचे लक्षण आहे. जर तुम्ही आधीच विवाहित असाल आणि तुमच्या स्वप्नात एखादी व्यक्ती नाचताना दिसली तर हे लक्षण आहे की तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा अधिक वाढणार आहे.
3. लाइफ पार्टनरसोबत फिरत असल्याचे स्वप्न - स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्वप्नात जत्रेत किंवा कुठेही फिरताना स्वत:ला पाहत असाल तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमचे लवकरच लग्न होणार आहे.
4. स्वप्नात मध पाहणे स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मध दिसला तर ते शुभ चिन्ह मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच लग्न करणार आहात. जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला मध खाताना पाहिले असेल तर ते सोन्याहून पिवळे मानले जाते.
5. मोराची पिसे पाहणे स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मोराचे पंख दिसले तर ते देखील शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमच्याकडे लग्नासाठी एक चांगला प्रस्ताव येणार आहे आणि तुमचे लग्न लवकरच होणार आहे.