प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 16 मे : वैशाख मासातील कृष्ण पक्ष अमावास्येला ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाते. ही कृष्ण पक्षाची शेवटची तिथी आहे. यानंतर शुक्ल पक्ष सुरू होतो. या वेळी वैशाख अमावस्या आणि वैशाख दर्श अमावस्या या दोन्ही एकत्र आहेत. वैशाख अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे. असे केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. स्नान आणि दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी वैशाख अमावस्या तिथी, शुभ मुहूर्त, स्नान आणि दान यांचे महत्त्व सांगितलं आहे.. वैशाख अमावस्या 2023 तिथी - हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख कृष्ण अमावस्या तिथी गुरुवार, 18 मे रोजी रात्री 09:42 वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी, शुक्रवार, 19 मे रोजी रात्री 09:22 वाजता समाप्त होते. यावर्षी 19 मे रोजी उदयतिथीनुसार वैशाख अमावस्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी वैशाख दर्श अमावस्याही होईल. अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर स्नान-दान वैशाख अमावस्येच्या दिवशी सकाळपासूनच स्नान आणि दान सुरू होते. या दिवशी सकाळी पवित्र नद्यांमध्ये स्नान करा आणि नंतर आपल्या क्षमतेनुसार दान करावे. असं केल्यानं पुण्य लाभ होईल. वैशाख अमावस्येला सकाळी 08.54 ते दुपारी 02.00 पर्यंत चांगला काळ आहे. सकाळी 08:54 ते सकाळी 10:36 पर्यंत सामान्य मुहूर्त असेल. त्यानंतर सकाळी 10:36 ते दुपारी 12:18 पर्यंत लाभ उन्नतीचा मुहूर्त आहे. त्या दिवशी अमृत सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:18 ते 02:00 पर्यंत असतो.
वैशाख अमावस्या 4 कारणांसाठी खास - 1. यावर्षी वैशाख अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान शोभन योग असेल. सकाळपासून संध्याकाळी 06.17 पर्यंत शोभन योग आहे. शुभ कार्यासाठी शोभन योग चांगला मानला जातो. 2. वैशाख अमावस्येला शिववास आहे. या दिवशी ज्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यायचा आहे, ते शिववासात रुद्राभिषेक करू शकतात. ज्येष्ठ अमावस्येला शिववास सकाळपासून रात्री 09.22 पर्यंत आहे. हा शिववास गौरीसोबत आहे. अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग 3. न्यायाची देवता शनिदेवाचा जन्म वैशाख अमावस्येला झाला होता, म्हणून या दिवशी शनि जयंती साजरी केली जाते. शनिमुळे वैशाख अमावस्या शनि अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्यानं शनिदोष, साडेसाती आणि धैय्याचा त्रास कमी होतो. 4. सावित्रीने ज्येष्ठ अमावस्येला यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते, म्हणून वट सावित्री व्रत वैशाख अमावस्येला पाळलं जातं. हे व्रत पाळल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. घरात पितृदोष असल्यास वेळ नका घालवू; अशुभ घडण्यापूर्वी हे उपाय करून घ्या (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)