JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / मोठी कामं करण्याची उत्तम संधी, पाहा कर्क राशीसाठी कसा आहे ऑगस्ट महिना?

मोठी कामं करण्याची उत्तम संधी, पाहा कर्क राशीसाठी कसा आहे ऑगस्ट महिना?

कर्क राशीच्या व्यक्तींना ऑगस्ट महिना कसा जाईल? ‘हे’ इथं चेक करा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 जुलै : अधिक आणि त्यानंतर येणाऱ्या श्रावण महिन्यानं सध्या सर्वत्र सण आणि व्रत वैकल्याचे दिवस सुरू आहेत. 2023 हे वर्ष अर्ध्यापेक्षा जास्त संपलंय. आता लवकरच ऑगस्ट महिना सुरू होतोय. कर्क राशीच्या व्यक्तींना हा महिना कसा असेल? याची माहिती पुण्यातले ज्योतिषशास्त्र अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांनी दिली आहे. कशी आहे ग्रहस्थिती? सध्या रवी कर्क राशीमध्ये आहे. साधरण 17 ऑगस्टनंतर तो सिह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. 17 आणि 18 ऑगस्टला शुक्र हा वक्री होत आहे. कर्क राशिमध्ये शुक्र वक्री झाल्यामुळे या लोकांना हा महिना बऱ्यापैकी आनंददायक असा राहील. हा महिना आनंदी राहील किंवा मनासारखी काही काम होतील, तसंच घरातही आनंदाचं वातावरण असेल, असं मारटकर यांनी सांगितलं.

‘धनस्थळ असलेला मंगळ हा महिन्याच्या मध्यावर्ती तिसऱ्या स्थानात जात असल्यामुळे महिन्याच्या साधारण 15 ऑगस्ट नंतरचा काळ हा आर्थिक दृष्टीनं फायद्याचा ठरु शकतो. मंगळ तिसऱ्या स्थानात आहे. हा एक कर्तृत्व आणि पराक्रमासाठी अनुकूल असल्यामुळे 17 ऑगस्ट नंतर आपल्याकडं मोठी महत्त्वाची कामे पार पडतील कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल.मात्र भावंड, नातेवाईकांशी वादविवाद या काळामध्ये होऊ शकतात,’ असा अंदाज मारटकर यांनी व्यक्त केलाय. मेष राशीसाठी कसा जाणार ऑगस्ट? ‘या’ तारखेनंतर होईल दडपण कमी! रवीचे भ्रमण धनस्थळावर होणार आहे. या काळामध्ये मोठे आर्थिक नियोजन कराल. नोकरीमध्ये पगार वाढवण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. त्याचबरोबर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची महत्त्वाच्या पदावरती निवड होईल. मात्र आठव्या स्थानामध्ये शनी असल्यानं दीर्घ आजाराची शक्यता आहे. या काळामध्ये सांधेदुखी किंवा हाडांचे दुखणे या काळामध्ये वाढण्याची शक्यता असून, घरातील मोठ्या लोकांची काळजी  घ्यावी लागेल.  गुर ग्रह दशमस्थानात आहे. धार्मिक सण उत्सव उत्साहाने साजरे करा. श्रावण महिन्यात वेगवेगळे उपक्रम राबवा, असा सल्लाही मारटकर गुरुजी यांनी दिलाय.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या