JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / महादेवांचा पुत्र रागाच्याभरात पर्वतावर आला तेव्हा...आजही होते अस्थींची पूजा

महादेवांचा पुत्र रागाच्याभरात पर्वतावर आला तेव्हा...आजही होते अस्थींची पूजा

कार्तिकेय देवाचं उत्तर भारतातील एकमेव मंदिरही याच राज्यात आहे. या मंदिराच्या आजूबाजूचं दृश्य अत्यंत सुरेख असून ते जणू भाविकांना मंदिराकडे आकर्षित करतं.

जाहिरात

त्यांनी स्वतःच्या शरीराचा सापळा घेऊन क्रौंच पर्वत गाठलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोनिया मिश्रा, प्रतिनिधी रुद्रप्रयाग, 10 जून : पूर्वीचं उत्तरांचल आणि आताचं उत्तराखंड हे राज्य ‘देवभूमी’ म्हणून ओळखलं जातं. त्याचं कारण म्हणजे पंचकेदार आणि पंचकैलासमधील महत्त्वाची स्थळं, गंगेचा उगम, हिमालयातील चारधाम, जगातील सर्वात उंच शिवमंदिर अशी अनेक महत्त्वाची तीर्थस्थळं या राज्यात आहेत. विशेष म्हणजे कार्तिकेय देवाचं उत्तर भारतातील एकमेव मंदिरही याच राज्यात आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात शिव-पार्वतीचे पुत्र कार्तिकेय यांचं ‘कार्तिक स्वामी मंदिर’ वसलेलं आहे. या मंदिराच्या आजूबाजूचं दृश्य अत्यंत सुरेख असून ते जणू भाविकांना मंदिराकडे आकर्षित करतं.

मंदिराचे पुजारी दिनेश प्रसाद थापलियाल यांनी सांगितलं की, पौराणिक कथेनुसार, शंकर देवाने एकदा आपल्या दोन्ही पुत्रांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कार्तिकेय आणि गणपतीला सांगितलं, ‘तुमच्यापैकी जो कोणी संपूर्ण विश्व फिरून प्रथम परत येईल, त्याची पूजा केली जाईल. सर्व देवतांमध्ये त्याला अग्रस्थान दिलं जाईल. मग काय, कार्तिकेय विश्वाचं परिक्रमण करण्यास काही क्षणातच स्वार झाला. परंतु गणपती मात्र जागचा हलला नाही. त्याने जरा वेळ थांबून आई पार्वती आणि वडील शंकर यांनाच प्रदक्षिणा घातली. ‘तुम्हीच माझं संपूर्ण विश्व आहात, तुम्हाला प्रदक्षिणा घालणं हे माझ्यासाठी विश्वाची परिक्रमा करण्यासारखं आहे’, गणपतीचे हे शब्द ऐकून शंकर-पार्वती दोघंही भारावून गेले. गणपतीच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला एक वरदान दिलं की, ‘कोणत्याही शुभकार्यापूर्वी सर्व देवी-देवतांच्या आधी तुझी पूजा केली जाईल’, असं त्यांनी सांगितलं. Women Desire : वाढत्या वयानुसार महिलांमध्ये वाढत जाते ‘ही’ इच्छा! संशोधनाने केला खुलासा.. तर दुसरीकडे मात्र स्वतःचा पराभव झालेला पाहून कार्तिकेय प्रचंड क्रोधीत झाला. त्याने रागाच्याभरात आपल्या शरीरावरील पूर्ण मास काढून आई-वडिलांच्या चरणात अर्पण केला आणि स्वतःच्या शरीराचा सापळा घेऊन क्रौंच पर्वत गाठलं. रुद्रप्रयाग-पोखरी मार्गावरील कनक चौरी गावाजवळ 3050 मीटर उंचीवर क्रौंच पर्वताच्या माथ्यावर वसलेल्या कार्तिक स्वामी मंदिरात भगवान कार्तिकेयच्या अस्थी आजही आढळतात. या अस्थींच्या दर्शनासाठीच लाखो भाविक दरवर्षी या मंदिरात येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या