JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / 10 वर्षांपूर्वी केला होता देहत्याग, आता या मंदिरात इच्छा पूर्ण होतात, अशी आहे मान्यता

10 वर्षांपूर्वी केला होता देहत्याग, आता या मंदिरात इच्छा पूर्ण होतात, अशी आहे मान्यता

आजही अशी मान्यता आहे की, बाबांच्या समाधीजवळील जळलेली राख घेऊन अंगावर लावल्यास त्वचारोग पूर्णपणे बरे होतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुलशन सिंह, प्रतिनिधी बक्सर, 1 जून : बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील ‘मोनिया बाबा’ या ठिकाणाची कीर्ती आज सर्वदूर पसरली आहे. मोनिया बाबा या संतांच्या समाधीवर ग्रामस्थांनी भव्य मंदिर उभारलं. पोखरा येथे हे मंदिर आहे. ग्रामस्थांच्या मते, येथे येणाऱ्या भाविकांना तहान-भूक लागत नाही. तसेच मंदिरातून परतावेसेही वाटत नाही. भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच मंदिराकडे जायला पक्का रस्ता नसतानाही, येथे भक्तांची मोठी गर्दी असते. खरंतर या मंदिराचा महिमा इतका अफाट आहे की, केवळ बिहारच नाही तर दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांसह इतर राज्यांतूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. ग्रामस्थ संजय कुमार यादव यांनी याबाबत सांगितलं की, अनेक दशकांपूर्वी येथे घनदाट जंगल होतं. त्यावेळी एक महात्मा या जंगलात राहू लागले. देवी जगदंबा भवानीवर त्यांची अफाट श्रद्धा होती. ते तिथे देवीची पूजा करत असत, मात्र घनदाट जंगलामुळे सर्वसामान्य व्यक्ती तिथे जाण्यास घाबरायचे.

महात्मा मात्र दिवस-रात्र देवीच्या नामस्मरणात तल्लीन असायचे, ते कोणाशी काही बोलायचे देखील नाही. त्यामुळे गावकरी त्यांना मोनिया बाबा म्हणू लागले. जो कोणी त्यांना भेटायचा आणि आपल्या अडचणी सांगायचा, त्याच्या सर्व अडचणी आपोआप दूर व्हायच्या. (भूकंप येऊ दे की आणखी काही, राम मंदिराच्या छताला काहीच होणार नाही, कारण…) दरम्यान, आजही अशी मान्यता आहे की, बाबांच्या समाधीजवळील जळलेली राख घेऊन अंगावर लावल्यास त्वचारोग पूर्णपणे बरे होतात. बहुतेक लोक हा चमत्कार मानतात, तर काही लोकांच्या मते राखेत जंतूनाशक घटक असल्यामुळे त्वचारोग बरा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या