JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ashadhi Wari 2023: निसर्गाचा शोध घेतला त्यात पांडुरंग भेटला, पाना-फुलांतून साकारला विठ्ठल, Video

Ashadhi Wari 2023: निसर्गाचा शोध घेतला त्यात पांडुरंग भेटला, पाना-फुलांतून साकारला विठ्ठल, Video

अवघ्या चराचरात विठ्ठल सामावला आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. तसेच कला दिग्दर्शक सुमित पाटील यांना विठ्ठल पाना फुलांत दिसतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 19 जून: ‘विठ्ठल जळी - स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला’ अशा तल्लीनतेने भक्त विठ्ठलमय झालेले असतात. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’, म्हणणाऱ्या संत सावता माळी यांना विठ्ठलाचं दर्शन शेतात होतं. तसंच वारकऱ्यांना विठ्ठल जळी, स्थळी अवघ्या चराचरात भेटतो. डोंबिवलीतील कला दिग्दर्शक सुमित पाटील यांना निसर्गातील पानाफुलांत विठ्ठल दिसतो. त्यांनी पाना फुलांपासून विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. विठ्ठलाचं हे मनोहरी रूप अत्यंत लोभस दिसत आहे. सुमितची निसर्ग वारी आषाढी एकादशी जवळ आली आहे. विविध ठिकाणाहून पालख्या निघाल्या आहेत. महाराष्ट्रातील वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरी जवळ करत आहेत. अशातच कला दिग्दर्शक असलेल्या सुमित पाटील याने विठ्ठलाची निसर्ग वारी करण्याचे ठरवले. त्याने ग्रामीण भागात जाऊन विविध लोकांची भेट घेतली. येथील लोकांच्या मनातील विठ्ठलाची प्रतिमा जाणून घेतली. त्या परिसरातील उगवणाऱ्या रानभाज्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याने त्याची कला साकारण्याचे ठरवले. कडुलिंब, केळी, पालक, नारळ, सुखा पेंढा अशा विविध निसर्गातील वस्तूंपासून त्याने सुंदर कलाकृती साकारली.

विठ्ठल भेटल्याचा आनंद वारी ही नेहमीच समतेचा एकतेचा आणि पर्यावरणाचा संदेश देते. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी असा तुकोबा महाराजांचा अभंग आहे. तुकोबांच्या हा अभंग ऐकल्यानंतर निसर्गामध्ये असलेला विठ्ठल सुरुवातीपासूनच मी शोधत होतो. त्याचं एक रूप म्हणजे ही निसर्गवारी आहे. मला विठ्ठल भेटल्याचा आनंद झाल्याचे सुमित सांगतो. रानभाज्यांतून विठ्ठल साकारताना मिळते ऊर्जा निसर्गाने महाराष्ट्राला जैव विविधतेची देणगी दिली आहे. यामध्ये रान भाज्यांचा समावेश आहे. काही रानभाज्या 12 महिने उपलब्ध असतात तर काही ऋतूनुसार उपलब्ध होतात. काही भाज्या आरोग्यासाठी उपयोगी असतात तर काही भाज्या जमिनीचा कस वाढावा यासाठी गरजेच्या आहेत. या भाज्यांचा विठ्ठल साकारल्यानंतर आम्ही या भाज्या शिजवून खातो. त्यामुळे त्यात विठ्ठल रूपाने साठलेली ऊर्जा आम्हाला मिळते असे सुमित सांगतो. Ashadhi Wari 2023: आता जावे पंढरीसी.., डोंबिवलीकर तरुणांचा अभंगनाद, Video नवीन शोध घेतो त्यात विठ्ठल भेटतो या सर्व रानभाज्यांची माहिती होतीच. मात्र पुढे जाऊन मी नवीन शोध घेतला आणि मला विठ्ठल भेटला, असं त्यानं सांगितलं. यावेळी निसर्ग हाच माझ्यासाठी विठ्ठल आहे आणि विठ्ठल हाच माझ्यासाठी निसर्ग आहे, असं सुमितनं नमूद केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या