प्रतिकात्मक छायाचित्र
पुणे, 11 जून : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज होणार आहे. संपूर्ण आळंदी नगरी आज दुमदुमून निघाली आहे. ज्ञानेश्वर माऊली, विठू नामाचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे स्वर याने संपूर्ण आळंदी नगरी भक्तीमय रसात नाहून निघाली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा संपूर्ण दिनक्रम कसा असेल पहा. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा कार्यक्रम - पहाटे 4 वाजता मंदिरात घंटानाद पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी काकड आरती संपन्न पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत श्रींच्या चलपादुकांवर भक्तांकडून महापूजा सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे स्पर्श सकाळी नऊ ते अकरा दरम्यान मंदिराच्या विना मंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता होईल त्यानंतर समाधीस पाणी घालणे आणि महानैवेद्य दाखवण्यात येईल. ऑनलाईन दर्शन लिंक - https://www.youtube.com/watch?v=ZyVYWArwCEg दुपारी साडेबारा ते एक दरम्यान भाविकांना समाधीचे दर्शन सुरू राहील. दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत मानाच्या 47 दिंड्यांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाईल. याच दरम्यान संजीवन समाधी मंदिरात श्रींचा पोशाख देखील केला जाईल. भाग्यवान लोकांना स्वप्नात या गोष्टी दिसतात; नशीब पालटण्याचे ते संकेत असतात दुपारी चारनंतर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, तो खालील प्रमाणे असेल - श्री गुरु हैबतबाबा यांचे हस्ते आरती होईल. त्यानंतर संस्थानातर्फे श्रींची आरती होईल. त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळाचा प्रसाद दिला जाईल. त्यानंतर विना मंडपात असणाऱ्या पालखीमध्ये श्रींच्या चलपादुकांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. संस्थांतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटे दिली जातील. यानंतर श्री गुरु हैबतबाबा यांच्यातर्फे मानाच्या दिंडींप्रमुख प्रतिष्ठित मानकरी यांना नारळाचा प्रसाद दिला जाईल. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे विना मंडपातून प्रस्थान होईल. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून बाहेर आणली जाईल आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम हा गांधीवाड्यात असणार आहे.