अपरा एकादशीचे महत्त्व
मुंबई, 11 मे : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात अनेक उपवास उत्सव साजरे केले जातात. अपरा एकादशी 15 मे 2023 रोजी साजरी केली जात आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, अपरा एकादशी दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अपरा एकादशीचे व्रत करण्याची परंपराही सुरू आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हे व्रत केल्यानं भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. अपरा एकादशीला भगवान विष्णूशिवाय पिंपळ आणि तुळशीचीही पूजा केली जाते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि मंत्र याविषयी माहिती देत आहेत. अपरा एकादशी तिथी - हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकादशी तिथीची सुरुवात 15 मे रोजी दुपारी 02:46 होते. 16 मे रोजी दुपारी 01:03 पर्यंत ही तिथी मानली जाते. उदय तिथीच्या आधारे अपरा एकादशी 15 मे रोजी साजरी होणार आहे. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूची उपवास करून पूजा केली जाईल. अपरा एकादशी पूजा पद्धत - धार्मिक ग्रंथ तज्ज्ञांच्या मते, दशमी तिथीपासून म्हणजेच 14 मे 2023 पासून एकादशीचा उपवास करावा, असाही सल्ला देण्यात आला आहे. - दशमीच्या तारखेपासूनच तामसिक अन्न म्हणजे लसूण, कांदा खाणे टाळावे. - दुसऱ्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नमन करा. यानंतर आंघोळ करून पिवळ्या रंगाची नवीन कपडे घाला. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि खाली दिलेल्या भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करून कटुंबाच्या रक्षणासाठी आवाहन करा.
॥ विष्णु शान्ताकारं मंत्र ॥ शान्ताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्ण शुभांगम् । लक्ष्मीकांत कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्व लौकेक नाथम् ॥ अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग सकाळी उठल्यानंतर हातात पाणी घेऊन व्रताचा मनात संकल्प करा. यानंतर फूल, फळे, दिवे, धूप, कापूर यांनी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. पूजेनंतर विष्णूला पिवळी मिठाई आणि पिवळी फळे अर्पण करा. यानंतर एकादशी व्रत कथेचा पाठ करून आरती करावी. - दिवसभर उपवास करा, या दरम्यान तुम्ही दिवसातून एकदा कोणतेही फळ आणि पाणी घेऊ शकता. संध्याकाळी आरती झाल्यावर फलाहार घ्या. देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)