मंचर, 18 जुलै : पुणे (pune) जिल्ह्यात महाविकास आघाडीत (mva government ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) नेत्यांमुळेच बिघाडी सुरू झाली आहे. खासदार अमोल कोल्हे (mp amol kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे वाद उफाळून आला आहे. ’ महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना डाववले गेलेच पण मलाही साधा फोन केला नाही आणि ज्यांनी मोठं केलं त्यांनाचा लक्ष केलं. कोल्हेंनी जेवढं स्क्रिप्ट दिलं तेवढंच वाचावे’ अशा शब्दांत माजी खासदार आणि सेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil) यांनी कोल्हेंना सणसणीत टोला लगावला. शिवाजीराव आढळराव यांनी आज लांडेवाडी इथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी अमोल कोल्हेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ‘जाहीर कार्यक्रमात थेट मुख्यमंत्र्यांना खासदार कोल्हेंनी काल लक्ष केलं होतं. कोल्हेंनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतूनच मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवरच बोलायचे हा या माणसातील गुणधर्म आहे का? असा सवाल आढळराव पाटील यांनी थेट कोल्हेंना विचारला. आता तुमचा Mobile Phone चोरी झाल्यास, मोदी सरकारकडून मिळेल अशी सुरक्षा ‘राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हतारे असं समीकरण जोडून लोकांची दिशाभूल केली जातेय. मी म्हातारा जरी असतो तरी माझ्याकडे बुद्धीमता, समज आहे, यांच्यासारखा नटसम्राटासारखं नाही’ असं म्हणत आढळरावांनी कोल्हेंना टोला लगावला. ‘मी खासदार असताना लोकसभेत भांडून 2018 ला माझ्या पाठपुराव्यामुळेच या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा केला. मार्च 2019 ला भूमिपूजन केलं. माझं श्रेय असताना मला डावललं जात आहे. आता मी खासदार नाही ठीक आहे. पण मला उद्घाटनाला किमान फोन तरी करायला हवा होता. मुख्यमंत्री यांचा फोटो तरी जाहिरातीत वापरायला पाहिजे होता. पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त बिघाडी इथले राष्ट्रवादीचे नेते,अमोल कोल्हे, दिलीप मोहिते करतात, असा आरोपही पाटील यांनी केला. घरपोच लसीकरणाला सुरुवात, अंथरुणाला खिळलेल्यांसाठी विशेष सुविधा, अशी करा नोंदणी तसंच, काल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले. कोल्ह्यानी उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नये, कोल्हेंला अडीच लाख पगार आहे. शिवाय हा माणूस म्हणतोय, शुटिंग केल्या शिवाय माझी चूल पेटत नाही तर मग सकाळी 7 ते संध्याकाळी 7 शुटिंगसाठी निवडून दिलंय? असा सवाल करत आढळराव यांनी सणसणीत टोला लगावला.