मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

घरपोच लसीकरणाला सुरुवात, अंथरुणाला खिळलेल्यांसाठी विशेष सुविधा, अशी करा नोंदणी

घरपोच लसीकरणाला सुरुवात, अंथरुणाला खिळलेल्यांसाठी विशेष सुविधा, अशी करा नोंदणी

वेगवेगळ्या वैद्यकीय कारणांमुळे (Medical reasons) अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांसाठी (Bed Ridden patients) घरपोच कोरोना प्रतिबंधक लस (Anti corona vaccine) पुरवण्याची सुविधा आरोग्य विभागामार्फत (Health Department) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  desk news

मुंबई, 18 जुलै : वेगवेगळ्या वैद्यकीय कारणांमुळे (Medical reasons) अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांसाठी (Bed Ridden patients) घरपोच कोरोना प्रतिबंधक लस (Anti corona vaccine) पुरवण्याची सुविधा आरोग्य विभागामार्फत (Health Department) उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी करून (Online registation) या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. लसीकरण पथकामार्फत अशा व्यक्तींशी संपर्क साधून त्यांच्या घरी जाऊन लस दिली जाईल, असं आरोग्य विभागानं कळवलं आहे.

राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती अशतील आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे असेल, त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये अंथरुणाला खिळून असणाऱ्या आणि पुढचे सहा महिने घराबाहेर पडण्याची शक्यता नसणाऱ्या व्यक्तींसाठीच ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

अशी करा नोंदणी

अशा व्यक्तींची नावे, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती covidvacc2bedridden@Gmail.com  या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणाची विनंती प्राप्त झाल्यानंतर अशा व्यक्तींचे लसीकरण पथकामार्फत करणे सोयीचे होणार आहे.

अंथरूणाला खिळून असलेली व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ञांचा दाखला तसेच या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींने लसीकरणासाठीचे संमतीपत्र माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

हजारो रुग्णांना होणार फायदा

अंथरुणाला खिळून असणाऱ्या व्यक्तींना विविध आजारांची लागण होण्याचा धोका सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा अधिक असतो. अशा परिस्थितीत कोरोनाची लागण झाली, तर या व्यक्तींसाठी ही बाब जीवघेणी ठरू शकते. अशा व्यक्तींना विलगीकरणात ठेवणेदेखील कठीण जाते. त्यामुळे या व्यक्तीना लवकरात लवकर लस देऊन कोरोनापासून सुरक्षित करणे महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर सांगतात.

हे वाचा - मोठी बातमी: मुसळधार पावसामुळे शिवडीत खचला रस्ता, बघा EXCLUSIVE PHOTOS

मुंबई उच्च न्यायालयाने दिली होती परवानगी

घरपोच लसीकरणाबाबत केंद्र सरकारच्या परवानगीची प्रक्रिया टाळून वेगानं अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली होती. त्यावर केंद्र सरकारच्या परवानगीची गरजच काय, असा सवाल कोर्टानं विचारत घरपोच लसीकरणाला हिरवा कंदील दाखवला होता. इतर अनेक राज्यांनीही ही सुविधा सुरु केली असल्यामुळे महाराष्ट्रात ती राबवायला काहीच हरकत नसल्याचं कोर्टानं म्हटलं होतं.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Health