JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 'नाय म्हणजे नाय', कोंबड्या घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला, VIDEO

'नाय म्हणजे नाय', कोंबड्या घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला, VIDEO

नांदे येथील शिंदेवस्ती येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड र्फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील संसर्ग झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 17 जानेवारी : पुणे  (Pune) जिल्ह्यात सुद्धा बर्ड फ्लूने (Bird Flu) शिरकाव केला आहे. दौंड पाठोपाठ आज मुळशी (Mulshi) तालुक्यातील नांदे येथे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडला असून  परिसरात खळबळ उडाली आहे. एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना एका चिमुरड्याला अश्रू अनावर झाले. नांदे येथील शिंदे वस्तीवर राहत असलेले अमित अशोक रानवडे यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत करून घेतली.  त्यावेळी त्यात बर्ड फ्लू विषाणू नसल्याचा अहवाल आला होता. मात्र, तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविला.

त्याचा अहवाल शुक्रवारी उशिरा आला आणि त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूच्या विषाणूने झाल्याचे निष्पन्न झाले.  प्रशासनाने नांदे परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना सूचना देऊन जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नांदे येथील शिंदेवस्ती  येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड र्फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील संसर्ग झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने संध्याकाळपर्यंत तेथील पोल्ट्रीतील सुमारे पाच हजारांवरून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली येईल, अशी माहिती तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॅा.सचिन काळे यांनी दिली. नागपूरमध्ये उघड्यावर फेकल्या कोंबड्या दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा भागातील शिवारातील शेतात दोनशे मृत कोंबड्या उघड्यावर फेकल्याचे तसंच मोहपा शिवारातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात मृत कोंबड्या फेकल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. नदीतील मृत कोंबड्या चार ते पाच दिवसांपूर्वी फेकल्या असाव्या, असा अंदाज पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या वाहनाद्वारे येथे आणून फेकल्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे धापेवाडा येथील पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांत 130 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याचे कारण अस्पष्ट आहे. मृत कोंड्याचे नमुने आज प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या