पुणे, 18 जून: माणसाप्रमाणे श्वानावर पण लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करता येते हे ऐकलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र पुण्यामध्ये अशी घटना घडली आहे. याठिकाणी एका श्वानावर अशा प्रकारची Bariatric सर्जरी करून 5 किलो वजन घटवण्यात आलं आहे. पुण्यातील कर्वेनगर इथं राहणाऱ्या यास्मिन दारुवाला यांच्या दीपिका या श्वानाला श्वास घेता येत नसल्याने ती एकाच जागी बसून राहायची. सुरुवातीला ती खेळायची, बागडायची मात्र कालांतराने तिच्या हालचाली मंदावल्या. जरा चाललं की दीपिकाला धाप लागत असे आणि थकवा जाणवू लागला होता. तासन तास ती एकाच जागी बसून राहू लागली. ही लक्षणे दिसू लागल्यानंतर तिच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. दरमहा 10 हजार रुपये इतका खर्च होत होता. मग दारुवाला कुटुंबाने पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नरेंद्र परदेशी यांची भेट घेतली. श्वानाच्या शरीरातील चरबीचे प्रमाण मोजण्यासाठी अनेक चाचण्या घेण्यात आल्या. आहारात बदलही करण्यात आला. पण फरक पडला नाही मग डॉ. परदेशी यांनी Bariatric सर्जरीचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतर 5 किलो वजन कमी झालं. शस्त्रक्रियेपूर्वी 12 तास श्वानाला द्रव आहारावर ठेवण्यात आलं होतं. शस्त्रक्रियेनंतर 7 दिवस केवळ सूप देण्यात आलं. आता नियमित व्यायाम आणि रपेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यशस्वी शस्त्रक्नंक्रियेनंतर ती परत खेळू, बागडू लागली आहे. हे वाचा- Pune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर ही शस्त्रक्रिया करून श्वानाच्या शरीरातील चरबी कमी करून 5 किलो वजन कमी करण्यात आलं आहे. आता तिचं वजन 45 किलो झालं आहे. शस्त्रक्रिया करणारे डॉ. शशांक शहा म्हणाले की, खूप व्यायाम आणि कमी जेवण घेतलं तरी लठ्ठपणा कमी होत नाही त्यामुळे लठ्ठपणा हा आजार आहे. मानवांप्रमाणे प्राण्यांमध्येही हा आजार धोकादायक आहे. प्राण्यांवर लठ्ठपणाची ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरणार आहे. मानवाप्रमाणे प्राण्यांच्या आहाराच्या सवयी बदलल्या की वजन वाढते हे स्पष्ट झालं आहे. लॅबरोडार, बॉक्सर, सेंट बरनोर्ड या भारतीय कुत्र्यांच्या प्रजाती असून त्यांना कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ जास्त प्रमाणात दिले जातात. यामुळं श्वानालाही लठ्ठपणा उच्च रक्तदाब, हृद्ययरोग हे विकार होऊ शकतात. श्वानाचे सरासरी आयुर्मान 12 ते 15 वर्षे असते परंतु लठ्ठपणामुळे ते 6 वर्षांनी घटू शकते.