Home /News /pune /

Pune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध

Pune Crime: आलिया आणि अयानचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर; पोलिसांच्या 7 टीम्स अजूनही घेताहेत नवरा आबिदचा शोध

पोलिसांच्या तब्बल सात टीम्सकडून आबिदचा शोध घेण्यात येतोय.

    पुणे, 17 जून : पुण्यातील (Pune city)  सासवडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिलेची आणि तिच्या मुलाची निर्घृण हत्या (Crime in Pune) करण्यात आली होती. या दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. तेव्हापासूनच या महिलेचा पती आबिद गायब आहे असं पोलिसांकडून (Pune police) सांगण्यात आलं होतं. तर महिला आलिया आणि तिचा लहान मुलगा अयान यांच्या मृतदेहांना पोलिसांनी शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवलं होतं. आता या दोघांचाही शवविच्छेदनाचा अहवाल (Postmortem report) समोर आला आहे. पोलिसांच्या तब्बल सात टीम्सकडून आबिदचा शोध घेण्यात येतोय. या प्रकरणात हत्या करण्यात आलेल्या माय-लेकाच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. आलिया (Alia and Ayan sheikh death case)  हिला बेदम मारहाण करून तिची हत्या करण्यात आली आहे. तर चिमुकल्या अयानचा गळा दाबून त्याची हत्या करण्यात आलीये. त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई ही पूर्णपणे महिलेचा पती आबिदवर आहे. घटनेच्या दिवसापासूनच आबिद गायब आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी लूक आउट नोटीसही जारी केला आहे. हे वाचा - मराठा समन्वयकांच्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी पोलिसांच्या 7 टीम्स आबिदच्या शोधात घटना घडल्यापासूनच अबिद कुठेच न दिसल्यामुळे पोलिसांचा संशय आबिद याच्यावरच आहे. आबिद यानं आपल्या पत्नीची आणि मुलाची हत्या करून पळ काढला असावा असं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच तो पूर्वेकडे दुबई देशात निघून गेल्याची शक्यताही नाकारता येत नाही असं पोलिसांचं मत आहे. नक्की काय आहे प्रकरण मंगळवारी पुण्यातील नवीन कात्रजच्या बोगद्याजवळ सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याची गळा आवळून हत्या केल्याची निष्पन्न झालं होतं. दरम्यान मुलाचे नातेवाईक मुलाचा शोध घेत असल्यानं मुलाची त्वरित ओळख पटली. त्यानंतर काही तासांतच पुरंदर तालुक्यातील खळद याठिकाणी आईचाही मृतदेह सापडला होता. याचा तपास सासवड पोलीस करत आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Crime news, Police, Pune

    पुढील बातम्या