JOIN US
मराठी बातम्या / पुणे / 'त्या'बद्दल शरद पवारांनी मला समजावून सांगावे, राज ठाकरेंचा पलटवार

'त्या'बद्दल शरद पवारांनी मला समजावून सांगावे, राज ठाकरेंचा पलटवार

‘माझ्या आजोबांनी त्या काळात जे घडले त्यावर सर्व लिहिले होते. ते काय बोललं नेमकं आपल्या सोईनुसार घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं’

जाहिरात

'माझ्या आजोबांनी त्या काळात जे घडले त्यावर सर्व लिहिले होते. ते काय बोललं नेमकं आपल्या सोईनुसार घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 20 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना (MNS Chief Raj Thackeray)  आजोबा प्रबोधनकार ठाकरे (prabodhankar thackeray) यांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. पण,   ‘मी जे काही बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार (sharad pawar) यांनी समजावून सांगावे’ अशी मागणीच राज ठाकरे यांनी पवारांना केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी थेट शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल मागणी केली आहे. ‘मी एका कार्यक्रमात जातीपातीच्या विषयाबद्दल विधान केलं होतं. पण, माझ्या विधानाचा आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विधानाचा काय संबंध होता. मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहे आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजून सांगावे, अशी विनंतीच राज ठाकरे केली आहे. ‘माझ्या आजोबांच्या पुस्तकात ज्या काळात घडले त्यावर सर्व लिहिलेलं होतं. ते काय बोललं नेमकं आपल्या सोईनुसार घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं. मी यशवंत चव्हाण सुद्धा वाचले आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. नो पार्किंगमधील गाडी चालकासह टोईंग; पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO तसंच,  ‘राज्यात जातीयवाद हा आताच नाही. ९९ च्या सालात जातीपाती होत्या. पण, त्यानंतर द्वेष हा आणखी वाढला. किंबहुना राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीपातीमध्ये द्वेष आणखी वाढला आहे.  प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान होता, त्यामुळे जातीपुरते मतदान होत होते. पण, दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण होणे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालं. हे सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे, पण बोललो फक्त मीच, असंही राज ठाकरे म्हणाले. पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू ‘मी बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास संशोधक म्हणून भेटलो होतो, ते ब्राम्हण आहे, म्हणून भेटायला गेलो नव्हतो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असं सांगताय, पण नेमकं काय चुकीचं लिहिलं ते तरी सांगा. त्यांनी पहिलं पुस्तक हे 50 वर्षांपूर्वी लिहिलं होतं, मग त्यावेळी चुकीचं जाणवलं नाही का? नेमकं आताच वाद कशाला उकरून काढायचा. मुळात यांना तरुणांची डोकी फिरवण्यासाठी आहे. मुद्दामवरून हे सर्व सुरू आहे. हे सगळं ठरवून चाललं आहे, असा टोलाही राज ठाकरेंनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या