JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Video : आता तुमच्या दारात येणार सलून व्हॅन, पुणेकर मायलेकींची भन्नाट आयडिया

Video : आता तुमच्या दारात येणार सलून व्हॅन, पुणेकर मायलेकींची भन्नाट आयडिया

पुण्यात एक चालतं-फिरतं सलून सुरू करण्यात आलंय. या पद्धतीचं देशातील हे पहिलंच सलून असल्याचा दावा याच्या मालकांनी केलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 2 जानेवारी : हेअर कट किंवा मेकअप करण्यासाठी आपल्याला सलूनची आवश्यकता भासते. काहीवेळा ही सुविधा घरपोचही मिळते. पण, घरी येऊन मिळणाऱ्या सुविधांमध्ये वेगवेगळ्या साहित्यांची कमतरता असल्यानं सर्व्हिस चांगली मिळत नाही असा अनेकांचा अनुभव आहे.  पुणेकरांची ही तक्रार आता दूर झालीय. कारण, पुण्यात एक चालतं-फिरतं सलून सुरू करण्यात आलंय. या पद्धतीचं देशातील हे पहिलंच सलून असल्याचा दावा याच्या मालकांनी केलाय. मायलेकींचा उपक्रम पुण्यातील सलॉन ॲपलचा 30 वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्तानं नयना आणि कांचन चोपडे या मायलेकींनी ‘सलून ऑन व्हिल’ ही सर्व्हिस सुरू केली आहे. यामध्ये तुमच्या दारातच सलूनची व्हॅन येणार असून एकाच व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप करता येईल. Video : पुणेकरांच्या आयुष्यात 2023 मध्ये काय होणार बदल? ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य ‘सलून ऑन व्हील्स’ ही संकल्पना भारतात सुरू करणारा ‘सलॅान ॲपल’ हा पाहिला ब्रँड आहे. सर्व लगबगीच्या प्रसंगात ग्राहकांना सोयीस्कर ठरेल अशी ही सेवा आहे, असा दावा नयना चोपडे यांनी केला. ‘अनेकदा महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये सलूनमध्ये जाऊन तयार होणे किंवा केसं, त्वचा आणि नखांची काळजी घेणं अवघड होतं. त्यावेळी सलून ऑन व्हील्स ग्राहकांकडे जाऊन त्यांना सोयी आम्ही देणार आहोत, अशी माहिती सलॉन ॲपलच्या सीईओ प्राची चोपडे यांनी दिली.

आमची व्हॅन नेहमी सॅनिटाईस केली जाणार असून त्यामध्ये स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये फक्त ब्रँडेड आणि डिस्पोजेबल साहित्य वापरण्यात येणार आहे. पुणे शहरातील सोसायटी, आयटी कंपन्या, महाविद्यालय तसंच मंगल कार्यालयांसाठी ही फायदेशीर आहे. त्यांनी अधिक माहितीसाठी 8799913711 या नंबरवर संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या