पुणे, 16 डिसेंबर : महाराष्ट्रात सणासुदीला पुरणपोळीचा मान असतो. ताटातील गोडसर पुरणपोळी जेवणाची लज्जत वाढवते. मात्र, अनेकदा पुरणपोळी वर्षातल्या मोजक्याच सणांना आपण बनवतो. त्यानंतर ही पुन्हा घरी कधी केली जाणार याची वाट पाहात बसतो. पण, आता वाट पाहण्याची गरज नाही. कारण,
पुण्यामध्ये
खास पुरणपोळी घर सुरू झालं आहे. यामध्ये आपल्याला तब्बल 24 प्रकारच्या पुरणपोळ्या वर्षातील 365 दिवस एकाच छताखाली मिळणार आहेत. पुणेकरांचं जिंकलं मन पुण्यातील आकाश ओवळकर या तरुणाने पुरणपोळी घर सुरू केले आहे. त्यानं अवघ्या तीन ते चार महिन्यांमध्येच अनेक पुणेकरांचे मन या पुरणपोळ्यांनी जिंकलंय. पुरणपोळी बनवणे खरंतर अतिशय अवघड काम असतं. कारण की पुरणपोळीचे पीठ अतिशय पातळ असतं त्याच्यामध्ये सारण भरून ती पुरणपोळी लाटायला लागते. पुरणपोळी लाटताना अनेकदा फाटते देखील आणि त्याचा सारण देखील बाहेर पडतं. यामुळे पुरणपोळी बिघडू शकते. पुरणपोळीसाठी आवश्यक पुरण बनवणं हा एक मोठा टास्क असतो. योग्य प्रमाणात सर्व जिन्नस घालून ते पुरण बनवायला लागतं. पुरणपोळीमध्ये भरून ते लाटून ती पुरणपोळी तव्यावर जाईपर्यंत आणि तव्यावर ती भाजून ताटापर्यंत येणे ही फार किचकट गोष्ट असते. त्यामध्ये पुरणपोळी कुठे फाटायला नको याची खबरदारी घ्यावी लागते. पुरणपोळीची चव तिच्या आवरणाचा पातळपणा आणि भरपूर सारे पुरण हे सगळं बेस्ट कॉम्बिनेशन जमणं खूप अवघड गोष्ट आहे.
पत्रकार तरुणानं सुरू केली कोल्हापुरातील पहिली हुरडा पार्टी, पाहा Inside Story
कोणते प्रकार उपलब्ध? ‘पुरणपोळी घरामध्ये 30 रुपयांपासून 70 रुपयांपर्यंत पुरणपोळी मिळते.आपण नेहमी खातो ती हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी, अंजीर पुरणपोळी, ड्रायफ्रूट पुरणपोळी, खोबरे पुरणपोळी, खजूर पुरणपोळी, बदाम पुरणपोळी अशा 24 प्रकारच्या पुरणपोळी इथं मिळतात,’ अशी माहिती आकाश यांनी दिली. ‘या सर्व पुरणपोळ्या दहा दिवस ताज्या राहतात. यामुळे या पुरणपोळ्या तुम्ही परदेशातही पाठवू शकता. रव्याच्या पिठापासून ही पुरणपोळी बनवली असल्यानं दहाव्या दिवशीही त्याची चव पहिल्या दिवसापर्यंत चांगली राहते. या पुरणपोळीवरती छान साजूक तूप लावण्यात येते. त्यामुळे ही अतिशय लुसलुशीत, गोड आणि चविष्ट अशी पुरणपोळी अनेकांना आवडते,’ असे आकाश यावेळी म्हणाले.
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून काय झालं… पाणीपुरी व्यवसायातून घेतली नवी भरारी, Video
‘मला इथली बदाम पोळी, खजूर पोळी खूप आवडते. आम्ही इथं नेहमी पुरणपोळी खायला येतो. वर्षभरामध्ये पुरणपोळी बनवणं शक्य नसतं. पण, येथील लाजवाब पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच आहे, अशी भावना येथील नियमित ग्राहक प्रिया यादव यांनी व्यक्त केली.
गुगल मॅपवरून साभार