जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून काय झालं... पाणीपुरी व्यवसायातून घेतली नवी भरारी, Video

स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून काय झालं... पाणीपुरी व्यवसायातून घेतली नवी भरारी, Video

स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून काय झालं... पाणीपुरी व्यवसायातून घेतली नवी भरारी, Video

स्पर्धा परीक्षेसाठी प्रचंड अभ्यास केल्यानंतरही यश मिळालं नाही म्हणून नाशिकचा तरुण निराश झाला नाही. त्यानं स्वत:चा व्यवसाय सुरू करत यश मिळवलं आहे.

  • -MIN READ Local18 Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक 14 डिसेंबर :  नोकरीच्या पलीकडे देखील आयुष्य असतं, हे अनेकांना समजत नाही. ते नोकरी हेच सर्वस्व समजून त्यामागे लागतात. या प्रवासात अपयश आलं तर खचून जातात, निराश होतात आणि या निराशेतून टोकाचं पाऊल उचलतात. या प्रकारच्या अनेक घटना आपण बघितल्या आहेत, ऐकल्या आहेत. नाशिकच्या भूषण उगले या तरूणाने नोकरी लागली नाही, स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून हार न मानता स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून त्यामध्ये त्याला यश मिळालं आहे. अधिकारी होण्याची होती इच्छा भूषण मुळचा सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्रीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो कुटुंबीयांसोबत नाशिकरोड परिसरात राहतो. घरची परिस्थिती बेताची. वडिल लहान-मोठी नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. लहाणपणापासूनच हुशार असलेल्या भूषणचं शिक्षण नाशिक शहरात झालं. त्यानं सरकारी अधिकारी व्हावं अशी आई-वडिलांची इच्छा होती. Video : ‘त्या’ घटनेनं खेळाडू बनण्याचं स्वप्न भंगलं, पहिल्याच प्रयत्नात बनला अधिकारी आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भूषणने बारावी नंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. बीएससी केमेस्ट्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठी पुणे गाठलं. पुण्यात एमपीएससी आणि इतर परीक्षांचा अभ्यास केला. त्याला काही थोड्या मार्कांमुळे यशानं हुलकावणी दिली. वय वाढत असल्यानं त्यानं नोकरी करावी अशी घरच्यांची अपेक्षा होती. नोकरीच्या शोधात असलेला भूषण नाशिकला परतला. स्पर्धा परीक्षांचे प्रयत्न सुरू होते, पण यश मिळत नव्हतं. या सर्व प्रतिकुल परिस्थितीमध्येही निराश न होता भूषणनं व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. नाशिक शहरातील प्रमोद महाजन गार्डन परिसरात BSc Chat नावाने छोटासा गाडा सुरू केला. या ठिकाणी  पाणीपुरी,शेवपुरी,भेळपुरी, रगडा पॅटीस असे पदार्थ त्यानं सुरू केले. त्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये भूषणचा व्यवसायात जम बसला. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली आणि…मुंबईकरांना मिळाला नवा पदार्थ! पाहा Video ‘हतबल होऊ नका,व्यवसाय करा’ स्पर्धा परीक्षेत प्रत्येकालाच यश मिळत नाही. मी खूप प्रयत्न केले. अगदी कमी मार्कांमुळे मला अपयश आलं. मी त्यानंतरही खचलो नाही. मी प्रयत्न करण्याचा आणि त्यानंतरही यश मिळाले नाही तर व्यवसाय करण्याचा निश्चय केला होता. आजही माझे प्रयत्न सुरू आहेत. मी व्यवसाय सुरू केला आहे. यामधून वेळ मिळेल तसा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करतो,’ अशी प्रतिक्रिया भूषण उगलेनं व्यक्त केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात