JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे पोलिसांना थेट आव्हान, कोयता गँग नाही आता गावठी पिस्तूल गँगची दहशत...

पुणे पोलिसांना थेट आव्हान, कोयता गँग नाही आता गावठी पिस्तूल गँगची दहशत...

कोयता गँगमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा विषय ऐरणीवर आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 16 फेब्रुवारी : पुण्यात कोयता गँगची दहशत मागच्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. या कोयता गँगमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा विषय ऐरणीवर आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान कोयता गँगची चर्चा सुरू असतानाच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी आळेफाटा परिसरात आलेल्या दोन जणांना आळेफाटा पोलिसांनी गजाआड केले आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी आळेफाटा परिसरात आलेल्या दोन जणांना आळेफाटा पोलिसांनी गजाआड करण्यात आले आहे. प्रवीण यमनाजी निचीत (वय 45, रा. वडनेर खुर्द, ता. शिरूर) व सुरेश अरुमुगर मुपनार (वय 38, रा. पिंपरी पेंढार) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

हे ही वाचा :  श्रद्धा वालकर, अंजन आणि आता निक्की तिंघीचीही प्रेम प्रकरणातून हत्या; प्रेमाचं फ्रिज कनेक्शन!

संबंधित बातम्या

पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की, परिसरात बुधवारी (दि. १५) दुपारनंतर गावठी पिस्तूल विक्री करण्यास काही जण आळेफाटा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे यांना मिळाली.

जाहिरात

यानंतर पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, पोलिस हवालदार भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन अरगडे, लहानू बांगर यांच्या पथकाने बसस्थानक व परिसरात सापळा लावला. पाच वाजेच्या सुमारास चौकापासून जवळच असलेल्या चहाच्या दुकानाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले.

जाहिरात

दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नावे विचारले असता त्यांनी पिस्तूल हे विक्री करण्यासाठी आळेफाटा येथे आणले असल्याची कबुली दिली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यातील प्रवीण निचीत हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हे ही वाचा :  नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखायला लागलं, तपासणीनंतर चुलत मामाचं दुष्कृत्य आलं समोर

जाहिरात

तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात काही गावठी कट्टे विकले आहेत का? याचा शोध घेण्याचे आवाहन आळेफाटा पोलिसासमोर असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या