लखनऊ, 16 फेब्रुवारी : अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. विनयभंग, बलात्कारासारख्या घटना वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत मामाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. या मुलीने भीतीपोटी हा प्रकार कुटुंबियांपासून लपवून ठेवला. पण ती गर्भवती असल्याचं स्पष्ट होताच, तिनं घडलेली घटना कुटुंबियांना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या चुलत मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सखोल तपास सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील इटावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नात्याला लाजवेल, अशी घटना घडली आहे. चुलत मामाने त्याच्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिली आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथे चुलत मामाने भाचीवर बलात्कार केला. या घटनेनंतर मुलगी घरी आली असता काही दिवसांनी तिने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर कुटुंबियांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. ही मुलगी गर्भवती असल्याचं अल्ट्रासाउंड तपासणीतून स्पष्ट झालं. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाई सुरू केली आहे. हेही वाचा : श्रद्धा वालकर, अंजन आणि आता निक्की तिंघीचीही प्रेम प्रकरणातून हत्या; प्रेमाचं फ्रिज कनेक्शन!
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, ``उदरनिर्वाहासाठी आम्ही कुटुंबासह नाशिक येथे राहत होतो. काही दिवसांपूर्वी आम्ही गावी परतलो. गावी परतल्यानंतर माझ्या 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. तिची प्रकृती जास्त बिघडू लागल्याने आम्ही तिला एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेलो. तिथं वैद्यकीय तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचं तपासणीतून स्पष्ट झालं.`` ही गोष्ट समजातच पीडितेच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी पीडित मुलीकडे या संदर्भात चौकशी केली असता, तिनं सांगितलं की ``सहा महिन्यांपूर्वी नाशिक येथे राहणाऱ्या चुलत मामाने माझ्यासोबत दुष्कृत्य केलं आणि ही बाब उघड केली तर जीवे मारू अशी धमकी दिली.`` त्यामुळे तिनं ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली.
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चुलत मामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. इटावाचे पोलीस निरीक्षक बिंदेश्वर मणी त्रिपाठी यांनी सांगितलं की, ``या प्रकरणात पीडितेचा चुलत मामा आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.``