त्याआधी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितलं की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून खूप काही शिकलो आहे आणि तशीच कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयानक असणार आहे.
पुणे, 31 मे : पुण्यात काल दिवसभरात 108 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत 108 रुग्णांची वाढ झाली असली तर दिवसभरात 194 रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे रुग्ण आता बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शनिवारी आठ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. 170 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 6201 इतकी आहे. यामध्ये डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल 5704 आणि ससून रुग्णालयात 497 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2248 आहे. तर आतापर्यंत एकूण 309 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंतच 3644 रुग्ण बरे झाले असून शनिवारी तब्बल 1200 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या या वाढत्या फैलावात शविवारी लॉकडाऊनचा पाचवा टप्पा अवलंबण्यात आला आहे. पण यामध्ये केंद्र सरकारने मोठी सूट दिली आहे. Unlock-1: या नियमांसोबत मिळणार सूट, नजर टाकूयात काय सुरू होणार आणि काय बंद केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. ग्रीन, रेड, ऑरेंज झोन रद्द करुन केवळ कंटेन्मेंट झोन असणार आहे. चित्रपटगृह, स्विमिंग पूल, जिम, आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद राहणार आहे. दुकानांमध्ये केवळ 5 लोक एकावेळी खरेदी करु शकतात. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोक उपस्थित राहू शकतात, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. यासाठी पासची आवश्यकता नसणार आहे. 8 जूननंतर कंन्टेमेट झोनशिवाय इतर ठिकाणी सर्व मंदिर, मॉल, शॉप्स खुले होतील. राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती विचार लक्षात घेत शाळा कॉलेज याचा विचार करावा अथवा पुन्हा जून अखेर आढावा घेऊन जुलै महिन्यात सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाबात महाराष्ट्रासाठी चांगली बातमी, ‘ही’ आहे दिलासा देणारी आकडेवारी संपादन - रेणुका धायबर