कोरोनाबात महाराष्ट्रासाठी चांगली बातमी, 'ही' आहे दिलासा देणारी आकडेवारी

(संग्रहित फोटो)

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये वेगाने वाढ होत आहे. मात्र अशा स्थितीतही एक दिलासादायक बातमी आली आहे.

  • Share this:
मुंबई, 31 मे : राज्यात शनिवारी 1084 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 28 हजार 81 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शनिवारी कोरोनाच्या 2940 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 34 हजार 881 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. मात्र अशा स्थितीतही राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. कारण राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी 17.5 दिवसांवर आला आहे. मागील आठवड्या हाच कालावधी 11.3 दिवस इतका होता. आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 65 हजार 168 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 43 शासकीय आणि 34 खासगी अशा 77प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष 3349 एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण 2553 एवढे आहे. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वारन्टाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारन्टाइन सुविधांमध्ये 72 हजार 681 खाटा उपलब्ध असून सध्या 35 हजार 420 लोक संस्थात्मक क्वारन्टाइनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11.3 दिवस होता तो आता 17.5 दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग 17.1 दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 43.07 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे. राज्यात 99 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली आहे. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- 81 (मुंबई 54, ठाणे 6, वसई-विरार 7, नवी मुंबई 2, रायगड 3, पनवेल 7, कल्याण डोंबिवली 2, नाशिक- 3 (जळगाव 3), पुणे- 12 (पुणे 6, सोलापूर 6), नागपूर-1, इतर राज्ये-2 राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये तर बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. शनिवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 62 पुरुष तर 37 महिला आहेत. शनिवारी नोंद झालेल्या 99 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 48 रुग्ण आहेत तर 49 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 2 जण 40 वर्षांखालील आहे. या 99 रुग्णांपैकी 66 जणांमध्ये ( 67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2197 झाली आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published: