JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News: पुणेकरांवर कोरोनाचा भीषण परिणाम; 22 टक्के लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पन्नही घटलं

Pune News: पुणेकरांवर कोरोनाचा भीषण परिणाम; 22 टक्के लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पन्नही घटलं

Coronavirus impact on Pune: ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन आणि अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या माध्यमातून या गटाने कोरोनाचा पुणेकरांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 मार्च : पुण्यातील काही तरुणांनी एकत्र येत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक सर्व्हे केला आहे. कोरोनाचा फटका पुणेकरांना चांगलाच बसला असून 22 टक्के नोकऱ्या गेल्या असून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही कमी झाल्याचा खुलासा या सर्व्हेमधून झाला आहे. कोव्हिड 19 मुळे देशभरात सुरुवातीच्या काळात टाळेबंदी करण्यात आली. त्याचे विविध क्षेत्रावर पडसाद उमटले. यामुळे पुण्यातील जवळपास 22 टक्के नागरिकांना नोकरी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसंच या काळात तब्बल 51 टक्के नागरिकांच्या उत्पन्नात घट झाल्याचेही समोर आलं आहे. तर निम्म्याहून अधिक नागरिकांना कोरोनाबाबत भीती वाटत असल्याचं या सर्वेक्षणात दिसून येत आहे. जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या पुण्यातील चाळीस युवा शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन कोरोनाविषयक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन आणि अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या माध्यमातून या गटाने कोरोनाचा पुणेकरांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला. सर्वेक्षणाबाबत महत्त्वाची माहिती सर्वेक्षणाला प्रतिसाद : 2,245 कालावधी : नोव्हेंबर- डिसेंबर 2020 स्वयं सेवी संस्थांचा सहभाग- 15 सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 69 टक्के नागरिक हे 18 ते 45 वर्षे वयोगटातील हेही वाचा:  अलर्ट! या बँकेच्या नावे नोकरी देण्याच्या बहाण्याने दिला जातोय धोका सर्वेक्षणात पुणेकरांमधील कोरोनाच्या परिस्थिती बद्दलची जागरूकता, सवयी आणि त्यांच्यावर कोरोनात झालेले आरोग्य विषयक आणि आर्थिक परिणाम अभ्यासण्यात आले. सामुदायिक शहाणपण या मानसशास्त्रातील तंत्राचा वापर करून परिस्थिती बद्दलचे अंदाजही या अंतर्गत वर्तविण्यात आले आहेत, असं श्रेया धावरे आणि काजल मोहिते या सर्व्हेक्षण करणाऱ्या विद्यार्थिनींनी सांगितलं आहे. कोरोना काळात नागरिकांच्या नोकरीवर झालेला परिणाम नोकरी गमावलेले : 22 टक्के नोकरी न गमावलेले : 78 टक्के कोरोना काळात उत्पन्नात झालेले बदल (टक्केवारीत) उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट : 23 टक्के उत्पन्नात छोट्या प्रमाणात घट :28 टक्के उत्पन्नात घट नाही : 42 टक्के उत्पन्नात छोट्या प्रमाणात वाढ : 5 टक्के उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ : 2 टक्के अल्प उत्पन्न गटात लसीकरणाचे महत्त्व अधिक दरम्यान, सर्वेक्षणात सहभागी 94 टक्के जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक उत्पन्न असलेल्या गटातील व्यक्तींमध्ये लसीकरणाविषयी संकोच दिसून आला. अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींमध्ये लसीकरणाचे महत्त्व अधिक सरकारी माहितीवर सर्वाधिक विश्वास आहे. 88 टक्के सहभागींनी सरकारकडून देण्यात येणाऱ्या करोनाविषयक माहितीवर तर 87 टक्के सहभागींनी सामाजिक संस्थांकडून देण्यात येणाऱ्या करोनाविषयक माहितीवर वि‌श्वास दर्शविला. हेही वाचा:  पंतप्रधान जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी मोदी सरकार देणार 7 लाख; असा करा अर्ज दूरचित्रवाणीतून मिळणाऱ्या माहितीवर 50 टक्के विश्वास, सोशल मीडियावर मिळणाऱ्या माहितीवर 20 टक्के विश्वास असल्याचं या सर्व्हेत पुणेकरांनी सांगितलं आहे. कोरोना काळातलं हे सर्व्हेक्षण धक्कादायक असलं तरी विचारमंथन करायला लावणारं आहे. कोरोनाचा जवळपास प्रत्येक घटकांवर परिणाम झाला असला तरी 22 टक्के नोकरी आणि उत्पन्नात घट झाली हे गंभीर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या